प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्याचे सर्व क्षेत्रांकडून स्वागत होत आहे. मात्र, या पॅकेजच्या निर्णयावर टीका करणारे कॉंग्रेसचे खासदार शशी थरुर यांना ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी चांगलेच फटकारले आहे.
प्रतिनिधी
पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याचे सर्व क्षेत्रांकडून स्वागत होत आहे. मात्र, या पॅकेजच्या निर्णयावर टीका करणारे कॉंग्रेसचे खासदार शशी थरुर यांना ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी चांगलेच फटकारले आहे.
शशी थरुर यांनी टीका करताना म्हटले होते की, ‘मेक इन इंडीया’चेच नवे नाव ‘आत्मनिर्भर भारत’ असे दिले आहे. नव्या नावावर जुनाच सिंह (‘मेक इन इंडिया’चे बोधचिन्ह) विकला गेला आहे. यामध्ये आणखी काही नवे होते का? असा सवालही त्यांनी केला. हे सगळे शायरीच्या अंदाजात ट्विट करताना ते म्हणाले, ‘नए नाम से वही पुराना शेर बेच गए, सपनों के वो फिर से ढेरों ढेर बेच गए..(मेक इन इंडिया अब) आत्मनिर्भर भारत, कुछ और भी नया था क्या?’
या टीकेवर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही शायरीतूनच उत्तर दिले. गुढग्यावर टिकलेले लोक, तुकड्यांवर विकलेले लोग, वडाच्या झाडाच्या गोष्टी करतात, हे कुंड्यांमध्ये उगवलेले लोक. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘कोहनी पर टिके हुए लोग, टुकड़ों पर बिके हुए लोग! करते हैं बरगद की बातें, ये गमले में उगे हुए लोग!!’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App