जीवनच आपल्याला शिकवते, शांतपणे ऐका


प्रख्यात अभिनेत्री हेमा मालिनी एका मुलाखतीत सांगतात, बी. अनंतस्वामींनी मला ड्रीम गर्ल म्हटलं आणि हे नाव आजपर्यंत मला चिकटलं. वय वाढताना कधी मला या नावाचं ओझं वाटलं नाही. आपल्यातला प्रत्येकजण दरदिवशी वाढत असतो. त्या वाढण्याच्या छटा आपल्या शरीरावर ,चेहऱ्यावर ,स्वभावावर दिसत असतात. Life teaches you, listen quietly

मला माझ्या गुरूंनी हे सारं तर होतच जाणार मात्र आपण आतून सुंदर स्वच्छ असलो तर तेच आपल्या आजुबाजूला प्रकर्षानं जाणवतं हे शिकवलं. आपणच आपली दिनचर्या ठरवतो. मग ती अस्ताव्यस्त करण्यात काय अर्थ आहे. दिवसाचा सुरवातीचा काही वेळ स्वतःला द्यायला हवा. स्वतःच्या स्वप्नपुर्तीकडे पाहताना शरीराच्या स्वास्थ्याचाही विचार करायला हवा. मनाने आनंदी व्हायला हवे. दर दिवशीच्या आपल्या वाढण्याला समजून घ्यायला हवे. शरीर आणि मन स्वस्थ असेल तरच दिर्घायू होण्यात मजा आहे. अन्यथा अंथरुणावर खिळून जगण्यात काय ती मजा आहे.

तुम्हाला तुमचे जीवन आनंदी करायचे असेल तर ज्यात तुम्हाला आवड आहे त्या गोष्टी करा. तुमच्या छंदाला महत्वा द्या. त्याचा कळतनकळत उपयोग तुमचे आरोग्य सुधारण्यावदेखील होत असतो हे लक्षात घ्या. तेव्हा आजूबाजूच्या काही उदाहरणावरून शिका वय हा नुसता एक आकडा आहे. जर तुम्हाला सर्वच बाबतीत स्वास्थ्य आवश्यक वाटत असेल तर आजपासूनच तुम्ही तुमच्या कृतींवर लक्ष द्या. तुम्हाला कुणी आडवलंय. मला डान्स आवडतो तसे कुणाला वाचायला आवडत असेल कुणाला बागकाम करायला. जे काही तुम्हाला आनंद देते ते आवश्य करा.

मनस्वास्थ्यासाठी ते आवश्यकही आहे. शिवाय शरीरस्वास्थ्यासाठी योगासने, चालणे, धावणे असा व्यायामही आवश्यक आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शरीर आणि मन आपणाला काही सांगत असतं. अगदी शांतपणे जे फक्त आपल्याला ऐकू येईल. ते ऐकायला शिका. त्यातच गंमत आणि जादू आहे.

Life teaches you, listen quietly

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी