‘जयोस्तुते’ गीतावर शास्त्रीय नृत्यातून सावरकरांना देणार मानवंदना


  • ५ देश, सर्व राज्यांतून ३६० कलावंतांचा सहभाग

विशेष प्रतिनिधी

पुणे : लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असताना देश विदेशातील नृत्यकलाकार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने व्हर्चुअली एकत्र येत आहेत. फेसबुक व इंस्टाग्राम लाईव्हद्वारे ‘जयोस्तुते’ या गीतावर भारत, अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, न्युझीलंड आणि कॅनडातील ३६० कलाकार शास्त्रीय नृत्याद्वारे अभिवादन करणार आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २८ मे रोजी १३७ वी जयंती आहे. यानिमित्ताने सारंग कुलकर्णी यांनी मांडलेल्या संकल्पनेतून ‘कलासक्त’ या शास्त्रीय नृत्यसंवर्धन संस्थेने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

झूमद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत सारंग कुलकर्णी म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील २७ वर्षे लाॅकडाऊन मध्येच गेली आहेत. या काळात सावरकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रत्येक क्षण हा राष्ट्रकारणी लावला आहे. अंदमानात त्यांनी प्रचंड साहित्यनिर्मिती केली. ते कायमच कलाकारांसाठी प्रेरणास्थानी राहिले आहेत. तेव्हा सध्याच्या या आपल्या लाॅकडाऊन मध्ये समाजाला आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन मिळावा यासाठी उपक्रमाचे आयोजन केले आहे.

कलासक्त संस्थेच्या विश्वस्त रसिका गुमास्ते म्हणाल्या, “भारतातील जवळपास सर्व राज्ये व पाच देशातील कलाकार यात सहभागी होत आहेत. पुण्यातील सुमारे १७५ जणांचा सहभाग आहे. कथ्थक, भरतनाट्यम, उडाली, कुचिपुडी यासह सहा नृत्यप्रकारात जयोस्तुते या हिंदी भाषेतील गाण्यावर सादरीकरण केले जाईल. विशेष म्हणजे यात अरुणाचल प्रदेशातील आदिवासी मुले पारंपरिक नृत्य यावेळी सादर करतील.”

सकाळी ९.३० ते रात्री ८ पर्यंत विविध भागातील कलाकार कलासक्तच्या फेसबुक व इंस्टाग्रामवरील पेज वर सादरीकरण करताना पहाता येणार आहे, असे स्मिता सोमण यांनी सांगितले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात