आतापर्यंत भारताची चाचणी क्षमता अत्यंत कमी होती. मागील आठवड्यापर्यंत फक्त ३६ हजार चाचण्या झाल्या होत्या. मात्र, खासगी संस्थांनाही परवानगी दिल्याने एकाच आठवड्यात चाचण्यांची संख्या ३६ हजारांवहून थेट ९७ हजारांवर पोहोचली आहे. आता तर प्रतिदिन १ लाख चाचण्या करण्याचे नियोजन केले जात आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरसविरोधातील लढाई आणखी तीव्र करण्यासाठी केंद्र सरकार प्रतिदिन एक लाख चाचण्या करण्याची क्षमता विकसित करणार आहे. सध्याची क्षमता प्रतिदिन दहा हजार चाचण्यांची आहे. ती जर प्रतिदिन एक लाखांवर पोहोचली तर दसपट क्षमता विकसित होईल. ही क्षमता जगामध्ये सर्वाधिक आहे.
“सध्या दोनशे सरकारी व खासगी चाचणी केंद्रे कार्यान्वित आहेत. त्यामध्ये प्रतिदिन दहा हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. ६ एप्रिलपर्यंत देशामध्ये ९६,२६४ चाचण्या झाल्या आहेत आणि त्यातून ३७१८ रूग्ण सापडले आहेत. पण आता मात्र आम्ही क्षमता दसपटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्याची केंद्रे २४ तास (तीन पाळ्यांमध्ये) काम करतील. वैद्यकीय महाविद्यालये, संशोधन संस्थांमध्येही चाचणी केंद्रे सुरू करण्यात येतील. याशिवाय कोब्बास ६८०० ही दोन मशीन्सदेखील कार्यान्वित करण्यात येतील. एकाचवेळी १४०० चाचण्या करण्याची क्षमता या मशीन्समध्ये आहे,” अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) म्हटले आहे.
भारतातील चाचण्यांची संख्या कमी असल्याने प्रादूर्भाव जाणवत नाही, अशी टीका केली जात होती. ‘ट्रॅक, टेस्ट आणि ट्रिटमेंट’ हीच तिसूत्री आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही चाचण्यांच्या कमी संख्येबद्दल सरकारवर टीका केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App