चक्रीवादळाविरुध्द लढण्यासाठी मदत करा, जे. पी. नड्डा यांचे आवाहन


पश्चिम बंगालवर येऊ घातलेल्या चक्री वादळाच्या संकटाविरुध्द लढण्यासाठी राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालवर येऊ घातलेल्या चक्री वादळाच्या संकटाविरुध्द लढण्यासाठी राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉँग्रेसच्या सरकारकडून भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. चीनी व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी सेवाभावाचा आदर्श निर्माण केला आहे. या चक्री वादळाचा मुकाबला करण्यासाठी कार्यकर्त्यांनी भोजन, निवारा आणि वैद्यकीय मदत द्यावी असे नड्डा यांनी म्हटले आहे.

आताची वेळ राजकारण करण्याची नाही. त्यामुळे भाजपाने आपल्या गौरवशाली परंपरेला साजेशे काम करावे, असे नड्डा म्हणाले. यासाठी राज्य सरकार, आपत्ती निवारण विभागाचे अधिकारी आणि डॉक्टरांशी सातत्याने संपर्कात राहा. लोकांना सुरक्षित स्थानी पोहाचण्यासाठी मदत करा, असे त्यांनी सांगितले.

चक्री वादळाच्या नुकसानीपासून जनतेला वाचविण्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक संभव प्रयत्न करत आहेत. यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी वरिष्ठ अधिकार्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेचा विचार करावा. यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नड्डा यांनी केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण