चंद्रकांत पाटील यांनी जोडप्याचा लावला ‘मंगल परिणय’

  • लॉकडाऊनमुळे रखडला होता विवाह 

विशेष प्रतिनिधी

पुणे : जानेवारीमध्ये त्यांचा साखरपुडा झाला. एप्रिलमध्ये विवाहाची तारीख ठरली आणि अचानक चिनी विषाणूचा उद्रेक झाला. दोन जिवांचे मिलन दोनदा पुढे ढकलावे लागले.

आता लग्न लागणार तरी केव्हा, अशी चिंता दोन्हीकडच्या कुटूंबियांना लागली. तेव्हा या जोडप्याच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते धावून आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत दोघांचा ‘मंगल परिणय’ घडवून आणला.

गुलटेकडी येथील डायस प्लॉट वसाहतीत राहणार्या प्रशांत सलगर (वय 28) आणि मार्केट यार्ड येथील प्रेमनगर वसाहतीमधील रेखा नटक्के (24) असे या नवविवाहित जोडप्याचे नाव आहे. स्वारगेटजवळील लक्ष्मीनारायण सिनेमागृह चौकातील तक्षशिला द्धविहारामध्ये या दोघांनी सहजीवनाची शपथ घेतली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, स्थानिक नगरसेवक श्रीनाथ भिमाले, झोपडपट्टी आघाडी सरचिटणीस गणेश शेरला आदी यावेळी उपस्थित होते.

प्रशांत हा सजावटीची कामे करतो. रेखा ही घरगुती कामे करते. जानेवारीत त्यांचा साखरपुडा झाला होता. एप्रिलमध्ये त्यांचा विवाह होणार होता. त्यासाठी एक मंगल कार्यालय नक्की करण्यात आले होते. परंतू, कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि त्यांचा विवाह रखडला. लॉकडाऊन उठेल या आशेने त्यांनी दोन वेळा विवाह पुढे ढकलला होता. विवाह होणार की नाही असा प्रश्न पडलेल्या कुटुंबियांची समस्या लक्षात घेऊन गणेश शेरला यांनी कुटुंंबाला अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्याचा सल्ला दिला. लग्नाचा दिवस ठरल्यानंतर पोलिसांच्या परवानगीसह अन्य तयारी करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी या लग्नाला
उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली.

अगदी साध्या पद्धतीने या दोघांचा मंगल परिणय तक्षशिला बुद्ध विहारामध्ये पार पडला. या विवाहाला प्रशांतचा मोठा भाऊ, मुलीची आई, बुद्ध विहाराचे अध्यक्ष गणेश चव्हाण, सचिन खंडाळे, अमोल खंडाळे, भन्ते सुनील गायकवाड उपस्थित होते. पाटील यांच्या उपस्थितीमुळे दोन्ही कुटुंब भारावून गेली होती. प्रशांतने लग्नासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे आभार मानले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात