गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा नेटकर्‍यांचे ‘गिऱ्हाईक’; म्हणे, मोदींच्या घोषणेमुळे जमली वांद्रयात गर्दी!

विशेष प्रतिनिधी

मुंबई :    राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा एकदा नेटकर्‍यांचे लक्ष्य झाले आहेत. नवे निमित्त आहे ते त्यांनी वांद्रे गर्दीचे खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडल्याने वांद्रेमधील जमलेल्या स्थलांतरीत मजुरांच्या धक्कादायक गर्दीने राज्य सरकारला टीकेचे धनी व्हावे लागत असताना देशमुख यांनी त्याचे खापर फोडले होते ते पंतप्रधानांवर. ते म्हणाले होते, की  “ज्या पद्धतीने मोदींनी लाॅकडाऊन जाहीर केले, त्यामुळे परप्रांतीय मजुरांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि ते वांद्रे येथे रस्त्यावर उतरले…”

या त्यांच्या विधानावर नेटकरी तुटून पडले. कारण मोदी यांनी लाॅकडाऊन वाढविण्याची घोषणा करण्यापूर्वीच तीन दिवस अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ११ एप्रिलरोजी लाॅकडाऊन वाढविण्याची घोषणा केली होती. शिवाय मोदींच्या घोषणेपूर्वीच महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, दिल्ली यासारख्या महत्वाच्या राज्यांनी लाॅकडाऊन वाढविण्याची घोषणा केली होती. शिवाय ११ एप्रिलरोजी झालेल्या पंतप्रधानांनी घेतलेल्या बैठकीत बहुतेक सर्वच मुख्यमंत्र्यांनी लाॅकडाऊन वाढविण्याची एकमुखी मागणी केली होती. त्यामुळे परप्रांतीयांसह सर्वांनाच लाॅकडाऊन वाढविण्याची पुरेशी कल्पना होती. तसे अपेक्षित होते. “जर मग उद्धव ठाकरे यांनी ११ एप्रिलला जाहीर केले होते, तर मग वांद्रे येथे मजूरांची गर्दी १४ एप्रिलला का जमली?,” असा प्रश्न नेटकरयांनी देशमुखांना केली.

“पंतप्रधानांच्या घोषणेच्या अगोदरच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी लाॅकडाऊन वाढविण्याची घोषणा केली होती. गृहमंत्री साहेब, तुम्हाला त्याची कल्पना नव्हती काय?” असा सवाल एकाने विचारला. “दुसरयाच्या नावाने खापर का फोडता? जमावबंदी असताना एवढे लोक जमलेच कसे? तुमचे पोलिस काय करत होते?,” असे दुसरयाने विचारले.

देशमुख सध्या दरवेळी विविध वादांमध्ये सापडत आहेत. ‘काठ्यांना तेल लावण्याचे’ आदेश पोलिसांना दिले आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे देशमुख हे वाधवा कुटुंबीयांना ऐन लाॅकडाऊनमध्ये महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्यावरूनही टीकेचे धनी झाले आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात