गर्भवती महिलेसह छत्तीसगडकडे पायी निघालेल्या ६३ मजुरांसाठी महापौरांकडून बसची व्यवस्था


विशेष प्रतिनिधी

पुणे : गरोदर महिलेसह लहान मुला-मुलींना घेऊन छत्तीसगडकडे पायी चालत निघालेल्या 63 मजुरांना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दोन खाजगी बसने छत्तीसगडकडे रवाना केले.

हिंजवडी भागातून गरोदर महिला व लहान मुलांसह 63 मजूर चालत निघाल्याची माहिती, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना छत्तीसगडवरून मिळाली आणि त्यांना मदत करण्याबाबत मागणी केली गेली होती. त्यावेळी फडणवीस यांनी महापौर मोहोळ यांना याबाबत फोन करून कल्पना दिली.

यानुसार महापौर मोहोळ यांनी संबंधित मजुरांशी संपर्क साधला असता. सर्व मजूर येरवड्यापर्यंत पायी पोहोचले होते. त्यावेळी मोहोळ यांनी मजुरांना आहे त्याच ठिकाणी थांबण्याची विनंती करत, त्यांची तात्पुरती राहण्याची सोय येरवड्यात केली. दरम्यान छत्तीसगडच्या प्रवासाची तांत्रिक परवानगी उपलब्ध करून घेत, या मजुरांची वैद्यकीय तपासणी करून सोमवारी दुपारी बारा वाजता दोन खासगी बसच्या माध्यमातून येरवडा पोलीस स्टेशनपासून त्यांना छत्तीसगडला रवाना करण्यात आले.

यावेळी महापौर मोहोळ यांच्यासह भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, राहुल भंडारे, संतोष राजगुरू, धनंजय जाधव, येरवडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक युनूस शेख, दुष्यंत मोहोळ आदी उपस्थित होते.

“मजुरांशी संपर्क केल्यावर त्यांना येरवड्यातच थांबण्याची व्यवस्था करुन त्यांच्या जाण्याचे नियोजन केले. पायी जाण्याची मानसिकता केलेल्या मजुरांना बसची व्यवस्था केल्याचे समजल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान मनाला आनंद देऊन गेले,” अशी भावना महापौर मोहोळ यांनी व्यक्त केली.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात