गँस सिलिंडर डिलीवरी बॉईज, अन्य वितरण कर्मचाऱ्यांना गँस कंपन्यांचे अनुदानाचे कव्हर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी गँस सिलिंडल डिलीवरी बॉईज व वितरण व्यवस्थेतील अन्य कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचे कव्हर जाहीर केले आहे. या कंपन्या देशभरात २७ कोटी ग्राहकांना सिलिंडर पुरवतात. त्यांची वितरण व्यवस्था मोठी आहे. पण डिलीवरी बॉईज व अन्य कर्मचारी हे कंपन्यांचे कायमचे किंवा कंत्राटी कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्यांची अार्थिक जबाबदारी थेट कंपन्यांवर येत नाही. परंतु, कोरोना प्रादूर्भावाच्या काळात त्यांचा मृत्यू ओढवला तर त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलियम कंपन्यांनी उचललेल्या या सकारात्मक पावलाचे स्वागत केले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात