‘कोरोना’ म्हणजे लुटीची संधी वाटते का ?; मनसेचा उद्धव सरकारला प्रश्न


  • मनसे’चा उद्धव सरकारला प्रश्न
  • निविदा प्रक्रीया रद्द करा

विशेष प्रतिनिधी

पुणे : “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी राज्याची परिस्थिती आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थात नक्की काय चालले आहे हे राज्याच्या कोणत्याही मंत्र्याला सांगता येणार नाही. नियमबाह्य पद्धतीने निविदा काढल्या जात आहेत. ‘कोरोना’ म्हणजे राज्यकर्त्यांना लुटीची संधी वाटते का,” असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला विचारला आहे.

“लोकप्रतिनिधीचे निधी वापरताना पुरवठादार आमचेच घ्या, असा दबाव काही राज्यपातळीवरील लोकप्रतिनिधी टाकत आहेत. या सर्व उपलब्ध निधीच्या माध्यमातून वरील खरेदी केली जात आहे व जनतेसाठी वापरली जात आहे. कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावात या सगळ्या गोष्टी पहिल्या टप्प्यात युद्ध पातळीवर घेणे गरजेचे असले तरी त्या नंतरच्या काळातही विना निविदा सगळ्या गोष्टी खरेदी करणे गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला मोकळं कुरण देणारे आहे,” असे ‘मनसे’ने म्हटले आहे.

राज्यातील सर्व स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विषयक अनेक प्रकारची उपकरणे, औषधे, अन्नधान्य, जेवण, उपचार केंद्र, क्वारंटाइन करण्याची ठिकाणे व त्या ठिकाणी आवश्यक जीवनावश्यक गोष्टी, इतर सार्वजनिक ठिकाणावरील जीवनावश्यक बाबी व तत्सम गोष्टीची खरेदी करत आहेत. या खरेदीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी, आमदार, खासदार इत्यादी लोकप्रतिनिधींचा निधी  वापरला जात आहे या निधी मध्ये इतरही अनेक अनुदानित निधीची भर पडत असल्याचे ‘मनसे’ने म्हटले आहे.

“लॉकडाऊनच्या बंदिस्त करून टाकणार्या जगात शासकीय पातळीवर कोण काय करतंय हेच जनतेला न कळणारं झालं आहे,” असा आरोप ‘मनसे’ने केला आहे. ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय,’ अशी स्थिती आहे. अगदी राज्यातल्या स्थानिक स्वराज्या संस्थात नक्की काय चाललं आहे हे राज्याच्या कोणत्याही मंत्र्याला विचारलं तर त्यालाही नीट सांगता येणार नाही, असा टोला ‘मनसे’ने लगावला आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे खाण्याचा प्रकार घडत असेल तर तो त्वरित थांबला पाहिजे. यातील गांभीर्य लक्षात घेता काढलेल्या निविदांची चौकशी करावी तसेच सर्व प्रकारची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारेच करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात