कॉंग्रेस सत्तेसाठी लाचार, हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा, विखे पाटील यांचे आव्हान


कॉंग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. राहूल गांधी स्वत: आम्हाला निर्णयाचा अधिकार नाही असे म्हणत असताना कॉंग्रेस नेते सत्तेला चिकटून बसले आहेत. हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा, असे आव्हान माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे.


विशेष्र प्रतिनीधी

मुंबई : कॉंग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. राहूल गांधी स्वत: आम्हाला निर्णयाचा अधिकार नाही असे म्हणत असताना कॉँग्रेस नेते सत्तेला चिकटून बसले आहेत. हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा, असे आव्हान माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे.

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी मंगळवारी राज्यातील कॉंग्रेसच्या स्थितीविषयी सांगितले होते. आम्ही महाराष्ट्रातील सरकारला पाठिंबा दिला असला, तरी आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही, असे गांधी म्हणाले होते. यावर बोलताना विखे-पाटील म्हणाले, सत्तेत असूनही निर्णय घेण्याचा अधिकार नसेल, तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडायची हिंमत दाखवावी.

विखे पाटील म्हणाले की, ‘राहुल गांधींचे विधान दुटप्पीपणाचे आहे. एकीकडे सरकारमध्ये राहायचे आणि दुसरीकडे आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे सांगायचे. तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नसेल, तर तुम्ही सरकारमध्ये कशाला थांबलात? काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. निर्णय घेण्याचा अधिकार नाही तर सत्तेतून बाहेर पडायची हिंमत दाखवा. सध्या काँग्रेसची अवस्था डबलढोलकी सारखी झाली आहे.

दरम्यान, विखे-पाटील यांच्या या वक्तव्यावर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अद्याप तरी उत्तर दिलेले नाही. विशेष म्हणजे थोरात सध्याच्या आघाडी सरकारमध्ये मंत्रीही आहेत. एकाच नगर जिल्ह्यातून येणाऱ्या विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात