उत्तर महाराष्ट्रात मालेगाव करोनाचे हॉटस्पॉट; नाशिक जिल्ह्याने गाठली शंभरी


  • नाशिक ११०, अहमदनगर ३१, जळगाव ५, धुळे ८, नंदुरबारमध्ये ७ करोना पॉझिटिव्ह
  • उत्तर महाराष्ट्रात करोना बाधितांचा आकडा १६३ , १५ रूग्णांचा मृत्यू 

विशेष  प्रतिनिधी

नाशिक : महाराष्ट्रात करोना विषाणूचा वाढता फैलाव चितेंचा विषय बनला आहे. आरोग्य यंत्रणा करोना विषाणूला थोपविण्यासाठी विविध उपाययोजना करत असली तरी अद्यापपर्यंत करोनावर नियंत्रण मिळविता आलेले नाही. देशासह महाराष्ट्रात हाहा:कार माजवणार्‍या करोनाने उत्तर महाराष्ट्रातही पाय पसरवले असून करोना बाधितांचा आकडा १६३ वर गेला आहे तर १५ वर रूग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात करोनाची वाढती संख्या चिंतेत टाकणारी अशीच आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात करोनाचा आकडा शंभरीच्या उंबरठ्यावर उभा असून मालेगावात आतापर्यंत ९६ पॉझिटीव्ह आढळून आले आहे, तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार हे ५ जिल्हे येतात. आतापर्यंत धुळे, नंदुरबार या दोन जिल्ह्यात करोनाचा शिरकाव झालेला नव्हता मात्र गेल्या तीन दिवसात धुळे जिल्ह्यात हा आकडा ८ तर नंदुरबारमध्ये आकडा ७ वर पोहचला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एक तर शहरात एक असे दोन करोनाग्रस्तांचे मृत्यू झाले आहे. नाशिक शहरात १० तर उर्वरित जिल्ह्यात ४ (मालेगाव वगळता ) करोनाग्रस्त आढळून आले आहे. अहमदनगरमध्ये करोनाग्रस्तांची संख्या ३१ वर पोहचली असून दोन जणांचा यात मृत्यू झाला आहे. अहमदनगरमधील जामखेडमध्ये करोनाग्रस्तांची संख्या ९ वर पोहचली आहे. तर जळगाव जिल्ह्यात ५ त्यात शहरातील तीन तर अमळनेर तालुक्यातील दोघा बाधितांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जळगाव जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या तीन दिवसांत ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये झपाट्याने करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. नंदुरबारमधील शहादा, अक्कलकुवा या तालुक्यांमध्ये करोनाने शिरकाव केला आहे. त्यात शहादा शहरातील २ तर अक्कलकुवामधील १ अहवाल तर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाह्मणे गावात काल एक महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील करोनाबाधितांची आकडेवारी (कंसात मृत्यू)
नाशिक: ४
नाशिक मनपा: १०
मालेगाव मनपा: ९६ (८)
अहमदनगर: ३१ (२)
धुळे: २ (१)
धुळे मनपा: ६ (१)
जळगाव: ५ (२)
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ७
नाशिक मंडळ एकूण: १६३ (१५)

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात