मोदींच्या ‘जनता कर्फ्यू’ला सरकारचा पाठिंबा; आवश्यकता वाटल्यास महाराष्ट्र बंद : टोपे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आवश्यकता भासल्यास महाराष्ट्र बंद ठेवण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. प्रसंगी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही थांबविण्यात येतील, मुंबईच्या लोकलसेवा पूर्वसूचना देऊन थांबविण्यात येतील, असे टोपे यांनी स्पष्ट केले. लोकांनी घराबाहेर पडू नये. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे प्रतिपादन :

  • महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५२
  • कोरोनाची लागण झालेले पाच जण डिस्चार्जच्या मार्गावर
  • आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत
  • पंतप्रधान मोदींचा जनता कर्फ्यूचा निर्णय योग्य, सर्वांनी सहभागी होऊन पंतप्रधानांच्या विनंतीला प्रतिसाद देऊ, कोरोनासारख्या संसर्गापासून मुक्त होण्यासाठी गर्दी टाळणे हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे
  • प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राकडून मदतीची अपेक्षा, प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राकडून मदतीची अपेक्षा
  • राज्यात डायग्नोस्टिक सेंटर आणि कोरोना किटची व्यवस्था वाढवणार, खाजगी रूग्णालयातही कोरंटाईनची व्यवस्था
  •  पंतप्रधान मोदींचं संपूर्ण भाषण ऐकलं, 22 तारखेला कर्फ्यु असावा अशी अपेक्षा केली आहे, अगदी योग्य निर्णय घेण्यात आला आहे. लोकांना विनंती प्रतिसाद देऊन कर्फ्यु पाळला पाहिजे
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात