पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या धीरोदत्तपणे चीनी व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत, याचे संपूर्ण जगातून कौतुक होत आहे. भारतातील कलाक्षेत्राकडूनही पंतप्रधानांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला आहे. देशभरच्या २११ कलाकारांनी एकत्र येऊन ‘वन नेशन वन व्हाईस – जयतु जयतु भारतम’ हे गाणे तयार केले असून पंतप्रधानांना अर्पण केले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या धीरोदत्तपणे चीनी व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत, याचे संपूर्ण जगातून कौतुक होत आहे. भारतातील कलाक्षेत्राकडूनही पंतप्रधानांच्या कार्याचे नमन करण्यात आले आहे. तब्बल २११ कलाकारांनी एकत्र येऊन ‘वन नेशन वन व्हाईस – जयतु जयतु भारतम’ हे गाणे तयार केले असून पंतप्रधानांना अर्पण केले आहे.
चीनी व्हायरसच्या संकटामुळे देशातील जनतेवर निराशेचे मळभ साठले आहे. या परिस्थितीत लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यासाठी २११ लोकप्रिय गायकांनी वन नेशन वन वॉइस- जयतु जयतु भारतम हे गाणे गायले आहे. स्वावलंबी भारताच्या भावनेतून प्रेरित होऊन हे गाणे केल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान आणि संपूर्ण देशाला हे गाणे अर्पित करत असल्याचे म्हटले आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी हे गाणं ट्विट केले आहे. पंतप्रधानांनी म्हटले आहे की, आजच्या काळातील अत्यंत गुणी २११ कलाकारांनी एकत्र येऊन आत्मनिर्भर भारताच्या प्रेरणेतून हे गाणे तयार केले आहे. पंतप्रधानांना ते समर्पित आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ट्विटरवर उत्तर देताना म्हटले आहे की, हे गाणं प्रत्येकाला प्रेरित करणारं आणि प्रत्येकामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करणारं आहे. यामध्ये स्वयंपूर्ण भारताचा जयघोष करणारे स्वर आहेत.
प्रसिध्द गीतकार प्रसून जोशी यांनी लिहिलेले हे गाणे संस्कृत, हिंदी, मराठी, तामीळ, तेलगू, कन्नड़, मल्याळाम, गुजराती, बंगाली, पंजाबी, आसामी आणि भोजपुरी सह 16 भारतीय भाषांमध्ये हे गाणे आहे.
आशा भोसले, अलका याग्निक, अनूप जलोटा, हरिहरन, एसपी बालासुब्रह्मण्यम, कैलाश खेर, कविता कृष्णमूर्ति, कुमार सानू, सोनू निगम आदींसह २११ जणांचा आवाज आहे. विशेष म्हणजे सर्व कलाकारांनी आपल्या घरातूनच या गाण्याचे रेकॉर्डिंग केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App