येत्या आठ ते दहा दिवसांत चीनी व्हायरसवर नियंत्रण मिळविणे शक्य असल्याच सरकारला विश्वास आहे. त्याचबरोबर चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक लढाईही आपण जिंकू असा विश्वसा केंद्रीय भूपुष्ठ वाहतूक आणि लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : येत्या आठ ते दहा दिवसांत चीनी व्हायरसवर नियंत्रण मिळविणे शक्य असल्याच सरकारला विश्वास आहे. त्याचबरोबर चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक लढाईही आपण जिंकू असा विश्वसा केंद्रीय भूपुष्ठ वाहतूक आणि लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
‘द क्विंट’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले, रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे.पण चीनी व्हायरसचे संकट हे प्रदेश-प्रदेशात आणि जिल्ह्या- जिल्ह्यात वेगळ्य स्वरुपाचे आहे. वेगवेगळ्या राज्यांत हॉटस्पॉट आहेत. त्यांच्यासाठी विशेष कृति कार्यक्रम बनवावा लागेल. पण त्याचबरोबर ज्या ठिकाणी व्हायरसचा प्रादुर्भाव कमी आहे, तेथील जनजीवन सुरळित कसे होईल यासाठी प्रयत्न केले जातील. या दोन्ही आघाड्यांवर सरकार काम करत आहे. सरकारला पूर्ण विश्वास आहे की चीनी व्हायरसविरुध्दची लढाई आपण जिंकू.
लॉकडाऊनमुळे लघु आणि मध्यम उद्योगांना सर्वाधिक फटका बसला असल्याचे सांगुन गडकरी म्हणाले, त्यांना वाचविण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. निर्यात वाढविणे आणि आयात कमी करणे हे लक्ष्य या उद्योगांना कार्यान्वित करून पूर्ण केले जाऊ शकते. फार्मा उत्पादने असोत की व्हेंटिलेटरसारख्या वस्तू आपल्या देशात जास्तीत जास्त उत्पादित करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोब रोजगार कसे वाढविता येतील यासाठीही आम्ही काम करत आहोत.
शेती, ग्रामीण आणि आदिवासी भागांत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी अनेक योजना आखल्या जात आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग त्यासाठी केला जात आहे. ११५ जिल्ह्यात त्यासाठी काम सुरू करत आहोत. आपल्या चामडे उद्योगाची उलाढाल १ कोटी ४५ लाख रुपये आहे. त्यामध्ये ९० ते ९५ हजार कोटी रुपयांची उत्पादने देशांतर्गत विकली जातात. सुमारे ५० हजार कोटींची निर्यात होते. या उद्योगाचे क्लस्टर मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेवर बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
लघू आणि मध्यम उद्योग असो की वाहतूक संदर्भातील असो सगळ्या प्रकारच्या कर्जांचे हप्प्ते स्थगित करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी १० टक्के खेळते भांडवलही देण्याचा प्रयत्न आहे. गडकरी म्हणाले, वाहतूक हळुहळु सुरू केली जात आहे. बंदरावरील काम आम्ही सुरू केले आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीमध्ये आणले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गही सुरू केले आहे. त्याचबरोबर उद्योजक कामगारांची पूर्णपणे काळजी घेण्यास तयार असेल तर त्यांना उद्योग सुरू करण्याची परवानगीही दिली जाणार आहे. मात्र, त्यासाठी कामगारांना मास्क, सॅनीटायझर आणि जेवण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी. मुंबई, पुणे यासारख्या जिल्ह्यांत रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. मात्र, काही जिल्ह्यांत एकही रुग्ण नाही. त्या ठिकाणी लॉकडाऊन टप्याटप्याने उठवून उद्योग चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more