अमित शहा यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरविणार्‍या चौघांना अटक


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियावर अफवा पसरवणार्‍या चौघांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. दोघांना भावनगर तर दोन जणांना अहमदाबादमधून अटक करण्यात आली आहे.


वृत्तसंस्था

अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियावर अफवा पसरवणार्‍या चौघांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. दोघांना भावनगर तर दोन जणांना अहमदाबादमधून अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर अमित शाह यांच्या तब्येतीविषयी गेल्या काही दिवसांत चुकीची माहिती पसरवण्यात येत होती. अखेरीस अमित शाह यांनी स्वत: स्पष्टीकरण देत आपली तब्येत ठणठणीत असल्याचं जाहीर केले. मागील काही दिवसांपासून काही मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या आरोग्यासंदर्भात वाटेल त्या अफवा पसरवल्या.

काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्विट करुन प्रार्थनाही केली, असेही शहा यांनी म्हटले होते.
शहा यांच्या तब्बेतीसंदर्भात सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झालेल्या अफवांसंदर्भात एप्रिल महिन्यामध्येही सकरकारच्या पत्रसूचना विभागानेच (पीआयबी) ट्विटवरुन खुलासा केला होता. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या नावाने मॉर्फ (छेडछाड आणि बदल) केलेला एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होता आहे. या फोटोमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

मात्र हा फोटो खोटा असून गोंधळ निर्माण करण्याच्या हेतूने तो ‘व्हायरल’ केला जात आहे. कृपया हा फोटो शेअर आणि फॉरवर्ड करु नका, असे आवाहन पीआयबीने केले होते. मात्र, तरीही काही विकृतांनी शहा यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरविणे सुरूच ठेवले. त्यांना धडा शिकविण्यासाठी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण