Trending

Sharad Pawar : “देवा भाऊ, शिवाजी महाराजांचे नाव घेता, पण बळीराजाकडे ढुंकूनही पाहत नाही!” नाशिक मधील भाषणात काय म्हणाले शरद पवार
Sharad Pawar साहेब खडे तो सरकारसे बडे, एकाच दिवसात पवारांच्या घोषणेला हरताळ फासे!!
  Download App
The Focus India 16 September 2025
  • होम
  • विशेष
  • विश्लेषण
  • आपला महाराष्ट्र
  • भारत माझा देश
  • माहिती जगाची
  • Web Stories
  • व्हिडिओज
  • आमच्याविषयी
  • BAKHARLive

बड्या बुजुर्गांना बाहेरचा रस्ता आणि आक्रस्ताळे यांना दरवाजा उघडा!!, अशी रणनीती काँग्रेसने अवलंबिली आहे. आज काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादग्रस्त नेते कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्याच वेळी पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडताना दिसत आहे. ज्यांच्या हट्टापायी राहुल गांधींनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासारख्या बुजुर्ग बड्या नेत्याचा राजकीय बळी दिला, त्याच नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींना तोंडघशी पाडले आहे. इतकेच नाही तर कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्या पक्ष प्रवेशाचा “मुहूर्त” त्यासाठी त्यांनी निवडून दाखवला आहे. Old experienced guards out; new controversial leaders in; congress new policy

काँग्रेसचे नेते आता कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांना प्रवेश देऊन आपण देशात फोफावत असलेल्या फॅसिझमच्या विरोधात लढाई लढण्याच्या बाता मारत आहेत. कन्हैया कुमारला तर त्यांनी अविष्कार स्वातंत्र्याचा पुतळा असल्याचा हारही घालून झाला आहे, पण त्याच वेळी काँग्रेसमधील बडे बुजुर्ग नेते बाहेर पडत आहेत हे राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांच्या गावीही नाही.

पंजाबमध्ये काँग्रेसची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे, तर दुसरीकडे गोव्यात माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांनी उघडपणे सोनिया गांधींना आता काँग्रेसचे काही खरे नाही. काँग्रेस दुरुस्त होऊ शकत नाही, असे पत्र लिहून उद्या तृणमूल काँग्रेस मध्ये निघून चालले आहेत. कॅप्टन अमरिंदरसिंग आणि लुईजिनो फालेरो यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांची राहुल गांधींच्या समर्थकांनी अशी “वाट” लावली असताना दुसरीकडे ज्यांच्यावर देशद्रोहाचे खटले सुरू आहेत, ज्यांना मतदारांनी चार -चार लाख मतांनी नाकारले आहे अशा तथाकथित तरुण नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन राहुल गांधी नेमके काय साधत आहेत?


काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर कन्हैया कुमारचे पोस्टर ,आज पक्षात होतील सामील


बिहारमधल्या बेगूसराय मतदारसंघात मोठा गाजावाजा उभा करून उभ्या राहिलेल्या कन्हैयाकुमार मतदारांनी चार लाख मतांनी आडवे पाडले. तेथे भाजपचे उमेदवार गिरिराज सिंह पुन्हा निवडून आले. ही फार जुनी घटना नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतली घटना आहे. त्या कन्हैया कुमारमध्ये काँग्रेसच्या राहुल गांधी समर्थकांना कोणते राजकीय ग्लॅमर दिसले? जिग्नेश मेवाणी यांनी गुजरातमध्ये असा कोणता राजकीय तीर मारला आहे? की ज्यामुळे काँग्रेसला तिथे राजकीय पुनरुज्जीवनाची संधी मिळेल?, या प्रश्नांची उत्तरे ना राहुल गांधींनी दिलीत. ना या दोन तथाकथित तरुण नेत्यांनी दिलीत!!

कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी हे वयाने तरुण आहेत. पण त्यांचे राजकीय कर्तृत्व सुरुवातीपासूनच एवढे वादग्रस्त राहिले आहे की त्यांचा काँग्रेस पक्षाला संघटनात्मक पातळीवर नेमका किती लाभ होईल? या विषयी पक्षातल्या उरलेल्या बुजुर्ग नेत्यांना शंका आहेत. ज्या काँग्रेसमध्ये आपले ऐकून मुख्यमंत्री बदलला त्या काँग्रेसमध्ये नवज्योत सिंग सिद्धूंसारखे नेते प्रदेशाध्यक्षपद सोडून देतात, तिथे काँग्रेसच्या पदांची आणि नेत्यांची विश्वासार्हता काय उरली आहे, हे दिसून येते.

नुसते वयाने तरुण नेते पक्षात घेऊन जर पक्षाला उभारी आणता आली असती तर राहुल गांधी त्यांच्या चाळिशीतच काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. गेल्या 10 वर्षात त्यांनी
असे काय राजकीय कर्तृत्व दाखविले की ज्यामुळे काँग्रेसचे राजकीय भवितव्य बहरून आले? 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस 44 खासदारांपर्यंत खाली जाऊन पोहोचली होती. 2019 च्या निवडणुकीत 55 खासदारांपर्यंत वर आली.

10 वर्षात 11 खासदार वाढविण्याचे “कर्तृत्व” जर राहुल गांधी यांच्यासारखा गांधी खानदानातला तरुण नेता दाखवत असेल, तर कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्यासारखे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे नेते असा कोणता राजकीय तीर मारणार आहेत की ज्यामुळे काँग्रेस संख्यात्मक पातळीवर काही बहर दाखवू शकेल??, हे प्रश्न मूलभूत आहेत. किंबहुना या प्रश्नांच्या उत्तरांमध्येच काँग्रेसचे खरे भवितव्य दडले आहे. पण सध्याचे काँग्रेसचे नेतृत्व मूलभूत प्रश्नांना भिडण्याऐवजी आणि त्यातून मार्ग काढण्याऐवजी नुसते आक्रस्ताळ्या नेत्यांनाच प्रवेश देऊन समाधान मानणार असेल तर प्रत्यक्ष ईश्वर जरी खाली उतरून उतरला तरी काँग्रेसला वाचवू शकेल की नाही या विषयी शंका आहे…!!

Old experienced guards out; new controversial leaders in; congress new policy

महत्त्वाच्या बातम्या

  • ‘सुतार समाजाला ब्राह्मणांमध्ये स्थान द्या’, आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गात घेण्याची पुण्यातील संघटनेची मागणी
  • रामलीलेतील श्रीरामालाच धमकी : पात्र साकारणारा मुस्लिम कलाकार दहशतीत, धर्मांधांच्या भीतीने पोलिसांत धाव, दानिशला खुद्द मुख्यमंत्री योगींचे पत्र
  • ना ओल्या दुष्काळाची चिंता, ना कोरड्या दुष्काळाची भीती; जाणून घ्या, पीएम मोदींनी लाँच केलेल्या पिकांच्या 35 नव्या वाणांबद्दल
  • कन्हैया कुमारने जाता जाता कम्युनिस्टांचा केला उन्हाळा, पक्ष कार्यालयातील एसीही काढून घेतला, आज काँग्रेसमध्ये प्रवेश
  • कलकत्ता उच्च न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला ठोठावला 10 हजारांचा दंड, 2.5 एकर जमिनीचे प्रकरण
Join WhatsApp Channel Join WhatsApp Channel

Categories

  • Birth Days
  • English
  • English Featured
  • Hindi
  • Hindi Featured
  • open
  • Photos of The day
  • Politics Features
  • review
  • Thought Of The Days
  • Top 10 News
  • trending
  • Uncategorized
  • V of day
  • आपला महाराष्ट्र
  • कार्टून
  • ताज्या बातम्या
  • दिल पे मत ले यार…
  • नवरात्री २०२१
  • भारत माझा देश
  • माहिती जगाची
  • राजकारण
  • विशेष
  • विश्लेषण
  • वेध अर्थजगताचा
  • व्हिडिओज
  • हलकं फुलकं

Latest Posts

  • Nepal
    Nepal : नेपाळ हिंसाचार प्रकरणी ओलींविरुद्ध FIR; पोलिसांना निदर्शकांवर अत्याचार करण्याचे आदेश दिल्याचा आरोप15 September 2025
  • Sharad Pawar
    मुद्दा ओल्या दुष्काळाचा आणि शेतकरी कर्जमाफीचा, पण “स्वप्न” महाराष्ट्राचा “नेपाळ” करायचा!!15 September 2025
  • Supreme Court
    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- राजकीय पक्षांमार्फत होणारे मनी लाँड्रिंग गंभीर बाब; ठोस कायदा का नाही15 September 2025

Popular Posts

Bihar
Bihar Election : बिहारमध्ये काँग्रेसला बिडीमुळे चटका?
September 6, 2025
Eknath Shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचणी नाहीत; भुजबळांशी चर्चा करून नाराजी दूर करू!
September 4, 2025
Narendra Modi
PM Narendra Modi at Shanghai Summit : शांघाय शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहशतवादावर प्रहार
September 1, 2025

Office Address

‘द फोकस इंडिया’, ज्योतिनगर, औरंगाबाद (महाराष्ट्र)

Email : thefocusindia123@gmail.com

© Copyrights 2025. All Rights Reserved. Technical Support by The Focus India
    • About Us
    • Contact Us
    • The Focus India Policy

Our website uses cookies to improve your experience. Learn more

Ok
×

  Download App