इम्तियाज अली हे भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये एक आदराने घेतले जाणारे नाव आहे. त्याने आजवर बरेच उत्कृष्ट सिनेमे बनवले आहेत. त्याच्या प्रत्येक सिनेमाबद्दल मुख्य गोष्ट म्हणजे, त्यांच्या प्रत्येक सिनेमाचे कथानक स्त्री पात्राला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले असते. एक काळ असा होता जेव्हा स्त्रियांना फक्त चार पाच गाण्यांमध्ये डान्स करण्यासाठी आणि हीरो ची प्रेयसी बनण्यासाठी सिनेमामध्ये घेतले जायचे. पण इम्तियाजने हा ट्रेंड बदलला. करण जोहरने हायप्रोफाईल मुलींच्या आयुष्यावर बनवलेले सिनेमे पाहून आपलेपणाची भावना कधीच येत नाही. ह्याच्या अगदी विरुद्ध इम्तियाज अलीच्या सिनेमामधील तुमच्या आमच्या मधलीच एक वाटणाऱ्या स्त्री कॅरेक्टरबद्दल थोडं जाणून घेऊयात या नवरात्र स्पेशल सदरात…
Women written by director imtiaz ali
१. रॉकस्टार मधील हीर : आपल्यापैकी बऱ्याच जणांना बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. पण लोक काय म्हणतील या विचाराने आपण त्या गोष्टी करण्यापासून थांबतो. मुलींसाठी तर मुलींच्या जन्मापासूनच हे करू नये आणि ते करू करावे असे रूल आपोआप सेट केलेले असतात.
रॉकस्टार या सिनेमातील हीर एक श्रीमंत घरातली एक सुंदर मुलगी असते. तिला सुद्धा आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. धमाल करायची असते. एक पॅशिनेट स्त्री, फ्री स्पिरिट असणारी पण जगासोबत लढताना मात्र घाबरणारी दाखवली आहे. पण जेव्हा ती प्रेमात पडते तेव्हा शेवटच्या श्वासापर्यंत त्याचे म्युझिक मधील करिअर चांगले व्हावे यासाठी प्रयत्नशील असते.
२. जब वी मेट मधील गीत : इम्तियाज अलीचा जब वी मेट हा सिनेमा तुम्ही पाहिला असणारच. हा सिनेमात प्रचंड हिट ठरला होता। बऱ्याच लँग्वेजमध्ये या सिनेमाचा रिमेक देखील बनवण्यात आला होता. या सिनेमातील मुख्य कॅरेक्टर होते गीत. एक अतिशय बडबडी, अल्लड, भोळी, भाबडी असलेली गीत एका मुलावर मनापासून प्रेम करते. मात्र तो तिला धोका देऊन निघून जातो.
असं म्हणतात की आयुष्याला दरवेळी एक नवीन संधी देऊन पाहिलं पाहिजे. गीतच्या आयुष्यामध्ये झालेल्या ट्रॅजेडीला ती कशी सामोरी जाते, ती आपल्या आयुष्यातला नवीन संधी देते का हा प्रवास या सिनेमामध्ये अतिशय उत्कृष्टरीत्या दाखवला आहे.
३. तमाशा मधील तारा : सगळं सोडून कधी ना कधी आपल्याला कोठेतरी दूर निघून जावंसं वाटतंच. या सिनेमातील तारादेखील अशीच तुमच्या आमच्यासारखी एक आहे. सोलो ट्रॅव्हलिंग, त्या प्रवासामध्ये तिला भेटलेला तिचा लव्ह ऑफ लाइफ, त्या दोघांची ताटातूट आणि त्या नंतर पुन्हा त्याला शोधण्यासाठी तारा दिल्ली मध्ये येते. जेव्हा ती दिल्लीमध्ये येते, त्याला भेटते तेव्हा तिला जाणवतं की, हा तो नाही ज्याला ती शोधत होती. त्यानंतर पुन्हा त्या दोघांची ताटातूट होते आणि तिथून त्या दोघांचा स्वत:ला शोधण्याचा प्रवास सुरू होतो. हा सर्व प्रवास इम्तियाज अलीने या सिनेमामध्ये अतिशय सुंदररीत्या मांडलेला आहे. एक स्ट्राँग, इंडिपेंडंट, डिटर्मिन्ड मुलीचा रोल दीपिका पदुकोणने प्ले केला होता.
४. हायवेमधील वीर : दिल्लीमधील श्रीमंत कुटुंबात वाढलेली मुलगी वीर. पण लहानपणी तिला लैंगिक छळाचा सामना करावा लागलेला असतो. हा अन्याय अतिशय जवळच्या व्यक्तींकडून झालेला असतो. त्यामुळे तिची आई तिला याविषयी कुठेही काहीही बोलू नको असे सांगते. चाइल्ड अब्युसमेंट हा सर्वात मोठा गुन्हा आहे. आणि या गुन्ह्याला लपविणारे दुसरे कोणी नसतात तर पीडितेच्या जवळचेच लोक असतात.
लहानपणी मनावर झालेला हा आघात, या ट्रॉमा मधून बाहेर पडण्यासाठी तिला स्वच्छंद, मोकळं, सत्यतेच्या अगदी जवळच नात असणारं आयुष्य जगायचे असते. विरचे किडनॅपिंग होते. जो तिला किडनॅप करतो त्याच्याच ती प्रेमात पडते. स्टॉकहोम सिण्ड्रोम वर आधारित हा सिनेमा इम्तियाजने बनवलेला आजवरचा सर्वात उत्कृष्ट सिनेमा आहे.
५. लव आज कल मधील मीरा : स्वप्न कोण नाही पाहत? इथे कोण स्वप्नाळू नाही? स्वप्न पाहणाऱ्यांना, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्यांना, कन्फ्युजनमध्ये असणार्या लोकांना आयुष्यामध्ये कोणत्या वेळी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे या गोष्टीचं कधी कधी गणित मांडता येत नाही. अशीच एक स्वच्छंद, इंडिपेंडंट, काहीशी कन्फ्युजनमध्ये असणारी मीरा लव्ह आज कल या सिनेमामध्ये इम्तियाजने अतिशय उत्कृष्टरीत्या दाखवली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App