दुर्गा सन्मान : महिला व मुलींच्या संरक्षण व सक्षमीकरणात कायमच आघाडीवर असलेल्या वैशाली केनेकर


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद – वैशाली संजय केनेकर, औरंगाबादच्या कॅन्टोन्मेंट परिक्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव. महिला आणि मुलींचा मुलींच्या संरक्षण आणि सक्षमीकरणात कायमच आघाडीवर राहिलेले हे बहुआयामी व्यक्तिमत्व. औरंगाबाद कँन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्यालयात त्या ऑफीस सुपरिटेंडट या पदावर कार्यरत आहेत. तसेच लैंगिक अत्याचार विरोधी समितीच्या त्या अध्यक्ष आणि कँन्टोन्मेंट बोर्ड कर्मचारी महासंघाच्या त्या उपाध्यक्ष आहेत.Protection of women and girls – Forever at the forefront of empowerment !!, Vaishali Kenekar

वैशालीताई गेली दहा वर्ष सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन काम करत आहेत. औरंगाबाद कॅंटोनमेंट हे राज्यातल्या सर्व कॅन्टोन्मेंटसाठी एक रोल मॉडेल बनावे, अशी त्यांची विकासाची दृष्टी आहे. त्यासाठी त्या कामही करत आहेत. महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी त्यांनी समाजात आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा पहिला दुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरव करताना द फोकस इंडियाला विशेष आनंद प्राप्त होत आहे.

Navratri 2021 Navdurga Mahatmya Devi Chandraghanta worshiped on third Day Of Navratri, Know Historical Story

 

महिलांचे आरोग्य, शिक्षण, त्यांच्याविरुद्ध होणारे लैंगिक अत्याचार यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी वैशाली ताईंनी 2013 पासून अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. महिलांना यामध्ये सहभागी होण्यासाठी तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष कामकाजात योगदान वाढविण्यापर्यंत त्यांनी महिलांना प्रोत्साहन दिले आहे. पुण्याच्या साधना इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.

महिलांना योग्य कायदेशीर सल्ला मिळवून देणे, कायदेशीर मार्ग दाखवणे आणि कायद्याची मदत देणे यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांचा लाभ आत्तापर्यंत दोन हजार महिलांनी घेतलेला आहे. महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणाचे एक मजबूत जाळेच औरंगाबाद कॅन्टोन्मेंट परिक्षेत्रात वैशालीताई यांच्या प्रयत्नातून उभे राहिलेले दिसते.

कॅन्टोनमेंट जन अधिकार मंच हा 2013 पासून त्यांनी कार्यरत केला आहे. यामध्ये महिला, मुले यांचे विविध गट तयार केले आहेत. महिला – मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांचे व्यक्तिमत्व आत्मनिर्भर व्हावे यासाठी वैशालीताईंनी भरोसा, दामिनी यांच्यासारखे अभिनव उपक्रम घेऊन मोठ्या प्रमाणावर जागृती केली आहे.

पॉक्सो कायद्यासंदर्भात समाजात जागृती निर्माण करण्यासाठी वैशालीताई यांनी 2013 पासून कार्यशाळा घेतल्या आहेत. बालकांच्या एकात्मिक विकासाचा राष्ट्रीय कार्यक्रम कॅंटोनमेंट परिक्षेत्रात अभिनव पद्धतीने राबविण्यासाठी त्या कायमच आघाडीवर राहिल्या आहेत. महिलांचे आणि मुलांच्या अधिकारांची जपणूक करून त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.

वैशालीताईंचे काम केवळ महिला आणि मुलांच्या क्षेत्रापुरते मर्यादित आहे असे नाही, तर पाणी हा देखील त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. कॅन्टोनमेंट परिक्षेत्रामध्ये स्वतःचे पाण्याचे स्रोत निर्माण करून महापालिकेवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. आता कॅंटोनमेंटचे रहिवासी स्वतःच्या पाण्याच्या स्रोतांचा वापर करून कॅन्टोनमेंटचे कोट्यवधी रुपये वाचवत आहेत.

या खेरीज कॅन्टोन्मेंटच्या ताब्यात असलेल्या विविध मालमत्तांचे ऑक्शन करून त्याची रक्कम वाढवून याचा लाभ कॅन्टोनमेंटच्या उत्पन्न वाढीत करण्याचा प्रयत्न वैशाली ताईंनी यशस्वी करून दाखवला आहे. वैशाली ताईंची विकासाची दृष्टी एकारलेली नाही तर बहुआयामी आहे हेच यातून स्पष्ट होते.

Protection Of Women And Girls – Forever At The Forefront Of Empowerment !!, Vaishali Kenekar

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात