प्रतिनिधी
लखनौ : जातिवाद – घराणेशाहीचे राजकारण उत्तर प्रदेशच्या जनतेने उद्ध्वस्त केले आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातल्या विरोधकांवर हल्लाबोल चढविला आहे. भाजपने उत्तर प्रदेशात बहुमत मिळविल्यानंतर विजयी मेळाव्यात ते बोलत होते.Yogis attack opponents in victory rally
राष्ट्रवाद, सुशासन आणि विकासाच्या मॉडलला जनतेने साथ दिली आहे. सबका साथ आणि सबका विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मार्गक्रमण करत आहोत. आमच्या डबल इंजिनच्या सरकारने उत्तर प्रदेशात सुरक्षा, संरक्षण निर्माण केलं. विकास केला. गरीब कल्याणकारी योजनांचा प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्यामुळेच उत्तर प्रदेशातील जनतेने जातीवाद, घराणेशाही वंशवादाच्या राजकारणाला तिलांजली देऊन आम्हाला भरभरून विजय मिळवून दिला आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.
CM YOGI IN ACTION: पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांवर योगी सरकारची मोठी कारवाई; देशद्रोहाचा खटला दाखल
उत्तर प्रदेशात प्रचंड विजय मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी मतदारांचे आभार मानत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्लाही चढवला. तसेच या विजयाने आमच्यावर मोठी जबाबदारी आली असून ही जबाबदारी पार पाडण्यास आम्ही सज्ज आहोत, अशी ग्वाहीही योगी आदित्यनाथ यांनी दिली.
पंतप्रधानांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला मार्ग मिळाला. आम्हाला तुम्ही प्रचंड बहुमत दिलं. आम्ही इतिहास बनवत आहोत. कोरोनाच्या संकटात रेशनपासून आम्ही सर्व काही उत्तर प्रदेशातील जनतेला दिलं. आम्ही करोना आणि भ्रष्टाचाऱ्याशी लढत होतो. तेव्हा हे लोक भाजप विरोधात षडयंत्र रचत होते. या षडयंत्रकारींना तुम्ही धडा शिकवला आहे. आता राष्ट्रवाद, सुरक्षा, विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यावर आम्हाला प्रचंड बहुमत दिलं आहे. या कसोटीवर आम्ही सिद्ध होऊ, असेही त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App