योगींनी फैजाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलले; केजरीवालही अयोध्येत रामचरणी येणार!!


वृत्तसंस्था

लखनऊ : परकीय आक्रमकांच्या नावाने असलेल्या शहरांची नामांतरे करण्याचा धडाका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावला आहे. त्यामध्ये आता अयोध्या नगरीच्या जवळ असणाऱ्या फैजाबाद रेल्वे स्थानकाचा समावेश झाला आहे.Yogi renamed Faizabad railway station; Kejriwal too will come to Ramcharani in Ayodhya

फैजाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. फैजाबाद रेल्वे स्थानक आता यापुढे आयोध्या कँन्ट या नावाने ओळखले जाईल.एकीकडे योगी सरकारने हा धडाकेबाज निर्णय घेतला असताना दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे अयोध्येत रामचरणी येणार आहेत. येत्या 26 ऑक्टोबरला अरविंद केजरीवाल यांचा अयोध्या दौरा निश्चित झाला असून ते त्याच दिवशी रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत.



उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका पाच महिन्यांवर येऊन ठेपली असताना अरविंद केजरीवाल यांना रामलल्लांची आठवण होणे याला फार राजकीय महत्त्व आहे. कारण हेच ते अरविंद केजरीवाल आहेत की ज्यांनी वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवून मोठी राजकीय हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात त्यानंतर ते कधी वाराणसीकडे फिरलेले दिसले नाहीत.

आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनासाठी येऊन उत्तर प्रदेशात आम आदमी पक्षाची राजकीय हवा तयार करू पाहत आहेत. त्यांना रामलल्ला किती पावतात आणि आम आदमी पक्षाला किती यश मिळते हे पाच महिन्यानंतर दिसणारच आहे.

Yogi renamed Faizabad railway station; Kejriwal too will come to Ramcharani in Ayodhya

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात