प्रतापगडमध्ये योगी आदित्यनाथांचा बुलडोझर पॅटर्न पोलीसांच्या कामी, बलात्काऱ्याला दोन तासात शरण येण्यास भाग पाडले


विशेष प्रतिनिधी

प्रतापगड : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंडांना वठणीवर आणण्यासाठी बुलडोझर पॅटर्न राबविला. या पॅटर्नचा फायदा पोलीसही घेत आहेत. प्रतापगड जिल्ह्यात बलात्कार करून फरार झालेल्या एका आरोपीला पोलिसांनी अवघ्या दोन तासात पकडले., यासाठी पोलीसांनी त्याच्या घरासमोर बुलडोझर दोन तास बुलडोझर आणून ठेवला.Yogi Adityanath’s bulldozer pattern in Pratapgad, police forced to rapist surrender in two hours

रेल्वे स्टेशनच्या सार्वजनिक शौचालयात महिलेवर बलात्कार करणाºया आरोपीला सरेंडर करण्यासाठी पोलिसांकडून सर्व प्रयत्न करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी वेगळाच पर्याय शोधला. ते आरोपीच्या घरासमोर बुलडोजर घेऊन पोहोचले. पुढील 24 तासात सरेंडर केलं नाही तर घर पाडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.प्रतापगडच्या परिसरात शनिवारी शौचालय संचालकाने एका महिलेसोबत दुष्कृत्य केलं होतं. महिलेसोबत बलात्कार केल्यानंतर रेल्वे पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलीस आरोपीला शोधण्यासाठी प्रयत्न करू लागले होते. घरापासून विविध ठिकाणी आरोपीचा शोध घेण्यात आला. शेवटी पोलीस अधिकारी आरोपीच्या घरी बुलडोजर घेऊन पोहोचले.

पोलीसांनी आरोपीच्या कुटुंबीयांना पुढील 24 तासांत आत्मसमर्पण न केल्यास त्यांचे घर पाडण्यात येईल, असा इशारा दिला. या धमकीचा परिणाम असा झाला की अवघ्या दोन तासांनंतर शहरात आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली.

Yogi Adityanath’s bulldozer pattern in Pratapgad, police forced to rapist surrender in two hours

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण