तृणूमलच्या गुंडांची उलटी गिनती सुरू, बंगालमध्ये भाजपचे सरकार येणार आणि दुर्गा-सरस्वती पूजेवर बंदी घालण्याची हिंमत नाही होणार, योगी आदित्यनाथ यांचा इशारा

तृणूमल कॉँग्रेसच्या गुंडगिरीची उलटी गिनती सुरू झाली आहे. २ मे नंतर बंगाल मध्ये भाजपाचे सरकार असेल. दुर्गा पूजा आणि सरस्वती पूजेवर बंदी घालण्याची कोणाची हिंमत होणार नाही आणि जर कोणी असे केले तर तो जेल मध्ये असेल,असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहेYogi Adityanath warns that BJP government will come to Bengal and will not dare to ban Durga-Saraswati worship


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : तृणूमल कॉँग्रेसच्या गुंडगिरीची उलटी गिनती सुरू झाली आहे. २ मे नंतर बंगाल मध्ये भाजपाचे सरकार असेल. दुर्गा पूजा आणि सरस्वती पूजेवर बंदी घालण्याची कोणाची हिंमत होणार नाही आणि जर कोणी असे केले तर तो जेल मध्ये असेल,असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचारसाठी योगी आदित्यनाथ यांनी दक्षिण २४ परगणा येथे सभा घेतली. यावेळी बोलताना योगी म्हणाले, उत्तर प्रदेशात गरीबांच्या जमिनी हडपणारे माफिया आता घरावर बुलडोझर चालवत आहेत.भाजप सरकारच्या या नजरेने टीएमसीचे गुंड घाबरतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी टीएमसीच्या गुंडांना इशारा देतो, जसे हे गुंड बंगाल मध्ये गुंडगिरी करत आहेत, तसेच काही राजकीय पक्ष उत्तर प्रदेश मध्ये पण गुंडगिरी करत होते. पण आज ते सगळे कुठे गेले हे कोणालाच माहित नाही.

बंगालमध्ये २ मेनंतर हेच होणार आहे.ममता बॅनर्जींवर हल्लाबोलत करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये कॉँग्रेस आणि तृणमूलच्या काळात भ्रष्टाचार, गरीबी आणि अराजकता वाढली आहे. दहा वर्षांत ममतांनी काहीही केले नाही.

कोणत्याही उद्योगाला व्यवस्थित चालू दिले नाही. येथे केवळ टीएमसीच्या गुंडांचा व्यापार वाढला आहे. कारण ममता बॅनर्जी गरीबांचा, शेतकऱ्याचा, मच्छिमारांचा विकासच होऊ देत नाही. त्यांना फक्त आणि फक्त तृणमूलचा विकास करायचा आहे. त्यांची घोषणा आहे माझा आणि तृणमूलचा विकास तर भाजपाची घोषणा आहे की सबा साथ सबका विश्वास.

ममता बॅनर्जी जय श्रीरामच्या घोषणेवर चिडतात असे सांगून योगी म्हणाले की, ममताा दिदी आता भगव्या रंगाला घाबरतआहेत. त्यांना माहित असायला हवे की भगवा रंग हा भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे.

भगवी वस्त्रे परिधान करूनच स्वामी विवेकानंद यांनी जागतिक व्यासपीठावर गर्व से कहो हम हिंदू है हा नारा दिला होता. अयोध्येत प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर होत आहे पण ममता ताईंना त्रास होत आहे.ममता दीदींना त्रास होतोय की अयोध्येत प्रभू श्री रामाचे मंदिर का बांधत आहेत?

Yogi Adityanath warns that BJP government will come to Bengal and will not dare to ban Durga-Saraswati worship

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*