world's largest arch bridge Completed on Chenab River by Indian Railway

WATCH : भारतीय रेल्वेचा जागतिक विक्रम, चिनाब नदीवर जगातील सर्वात मोठ्या आर्च ब्रिजची कमान पूर्ण

world’s largest arch bridge Completed on Chenab River by Indian Railway : जागतिक रेल्वेच्या इतिहासातील चमत्कार मानल्या गेलेल्या चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पुलाचा महत्त्वाचा भाग असलेल्या दीड किलोमीटर लांबीच्या कमानीचे काम सोमवारी पूर्ण झाले. रेल्वे अभियांत्रिकीमधील हे सर्वात मोठे आव्हान अभियंत्यांनी यशस्वीपणे पेलले आहे. सोमवारी दुपारी या कमानीवरील ५.३ मीटर उंचीचा तुकडा बसविण्यात आला. त्यामुळे कमानीचे दोन्ही भाग जोडले जाऊन भारतीय रेल्वेचा विक्रम जगासमोर आला आहे. चिनाब नदीच्या दोन्ही काठांना या कमानीमुळे ३५९ मीटर उंचीवरून जोडण्यात आले आहे. कटरा ते बनिहाल या 111 किलोमीटर मार्गावरील सर्वात अवघड टप्पा चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पूल होता. त्यासाठी 1400 कोटी रुपये खर्च आला आहे. केवळ चिनाब नदीचे दोन काठच नव्हे तर या पुलाच्या माध्यमातून काश्मीर ते कन्याकुमारी रेल्वेने थेट जोडले जाणार आहेत. कन्याकुमारीहून निघालेली रेल्वे थेट काश्मीरला कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचणे आता शक्य झाले आहे. world’s largest arch bridge Completed on Chenab River by Indian Railway

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*