वृत्तसंस्था
अयोध्या : अयोध्येतील श्री राममंदिराच्या कामाला वेग आला आहे. पावसाळ्यापूर्वी पायाचे काम पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. पायाचा प्रत्येक थर ७२ तासांत तयार होईल. प्रत्येक थर एक फूट आहे; परंतु दबाव दिल्यानंतर ११ इंच राहील. गेल्या बुधवारपासून या लक्ष्याला गाठण्यासाठी कामाला सुरुवातही झाली आहे. Work on Ram temple in Ayodhya is in full swing, Started in two sessions; Foundation before the rains
गेल्या महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने काम रखडले होते. आता अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराच्या बांधकाम वेगाने करण्यासाठी दोन सत्रात दिवसरात्र काम सुरु आहे. आता प्रत्येक थर तयार करण्याचे काम ७२ तासांत पूर्ण केले जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी मंदिराचा पाया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या कामाला आवश्यक वेग देण्यासाठी, तीर्थक्षेत्र न्यास ट्रस्टने बालाजी कन्स्ट्रक्शन या राजस्थानातील बांधकाम क्षेत्रातील नामांकित एजन्सीला काम दिले आहे एल अँड टी आणि टाटा कन्सल्टन्सीसारख्या उच्च प्रतिष्ठित कंपन्या मंदिराच्या कामात मदत करत आहेत. सुरुवातीपासूनच एल अँड टीने दोन मोठे प्रकल्प सुरू केले आहेत, तर बालाजी कन्स्ट्रक्शनने श्री राम जन्मभूमी कॉम्प्लेक्समध्येच काँक्रीट मिक्सिंग प्रकल्प स्थापित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App