महिलांनी निवडणूक लढवणे इस्लामशी बंडखोरी; त्यामुळे मजहब होतो कमजोर; अहमदाबादचे शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दिकींचे वक्तव्य


वृत्तसंस्था

अहमदाबाद : महिलांनी कोणतीही निवडणूक लढवणे ही इस्लामशी बंडखोरी आहे. त्यामुळे महजब म्हणजे धर्म कमजोर होतो. महिलांनी निवडणूक लढविण्याच्या आपण विरोधात आहोत, असे वक्तव्य अहमदाबादच्या जामा मशिदीचे शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दिकी यांनी केले आहे. Women contesting elections is a rebellion against Islam; So the religion becomes weak

गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचे उद्या सोमवारी मतदान होत आहे. त्याआधी आज रविवारी इमाम शब्बीर अहमद सिद्दिकी यांनी महिलांनी निवडणूक लढविण्यासंदर्भात प्रतिकूल वक्तव्य करून राजकीय वर्तुळात मोठे खळबळ उडवली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांचा व्हिडिओ जारी केला आहे.

गुजरात निवडणुकीचे वैशिष्ट्य असे, की याच अहमदाबादच्या शाही जामा मशिदीने सर्व मुस्लिमांना निवडणुकीत एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन केले आहे आणि आज त्याच्याच शाही इमामांनी महिलांनी निवडणूक लढविण्याला विरोध केला आहे.

इस्लाम आणि महिला या संदर्भात बोलताना इमाम सिद्दिकी म्हणाले, की इस्लाम मध्ये सगळ्यात जास्त महत्त्व नमाज पठणाला आहे. पण आपण मशिदीत महिलांना बघितलेले नाही. कारण इस्लाम मध्ये जर महिलांना लोकांपुढे आणण्याची परवानगी असती तर मशिदीत देखील त्यांना नमाज पढता आला असता. पण त्यांना मशिदीत नमाज पढण्यापासून का रोखण्यात येते तर इस्लाम मध्ये महिलांचे विशिष्ट स्थान आहे.

जे राजकीय पक्ष मुस्लिम महिलांना निवडणुकीत तिकीट देतात ते इस्लामशीच बंडखोरी करतात. त्या राजकीय पक्षांना निवडणूक लढविण्यासाठी मर्द मिळत नाहीत का? भारतात महिलांसाठीच राखीव जागा नाहीत. पण महिलांसाठी राखीव जागांची मजबुरी असती, तर त्या कायद्याची मजबुरी समजू शकलो असतो. पण अशी स्थिती भारतात नाही. त्यामुळे महिलांनी निवडणूक लढविणे ही इस्लामशी बंडखोरीच आहे. त्यामुळे मजहब कमजोर होतो. इस्लाम मध्ये हिजाबलाही महत्त्व आहे. निवडणूक लढवायची म्हणजे महिला लोकांसमोर येतात. मोठमोठ्या स्टेजवरून मते मागण्यासाठी भाषणे करतात आणि त्या हिजाब पाळू शकत नाहीत. महिलांना तिकीट देऊन नगरसेवक, आमदार, खासदार बनवले तर त्या महिला महापालिका, नगरपालिका, विधिमंडळ आणि संसदेत देखील हिजाब पाळू शकत नाहीत. आणि जर महिला लोकप्रतिनिधीच हिजाब पाळणार नसतील तर मुस्लिम समाज हिजाबचा मामला लोकांसमोर आणूही शकणार नाही. त्यामुळे धर्म कमजोर होतो इस्लाम मध्ये तर औरतचा आवाज पण औरत आहे. त्यामुळे मी ठामपणे महिलांनी निवडणूक लढविण्याच्या विरोधात आहे, असे शब्बीर सिद्दिकी म्हणाले.

पण राजकीय पक्ष यासाठी महिलांना तिकीट देतात की त्यांच्यामुळे सगळे कुटुंब मतांसाठी आपल्या ताब्यात येऊ शकते, असे त्यांना वाटते. या खेरीज राजकीय पक्षांचा दुसरा कोणताही महिलांना तिकीट देण्यामागचा हेतू मला दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला.

मुसलमानांनी एक गठ्ठा मतदान करावे

शब्बीर अहमद सिद्दिकी यांनी गुजरात मधल्या मुसलमानांना एक गठ्ठा मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मुस्लिम व्होट बँकेत फूट पडल्यानेच अहमदाबादच्या जमालपुरा सीटवर पण भाजपने कब्जा केला याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Women contesting elections is a rebellion against Islam; So the religion becomes weak

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण