संजय राऊत यांच्यावर आरोप करण्याची शिक्षा!, चित्रपट निर्मातीला बनावट पदवीप्रकरणी तब्बल दीड महिना तुरुंगात डांबले, अखेर उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर


विशेष प्रतिनिधी

मुंबई : क्लिनीकल सायकॉलॉजीतील बनावट पदवी असल्याचा कथित आरोप असलेल्या चित्रपट निर्मातीला तब्बल दीड महिन्यांनी जामीन मिळाला आहे. बनावट पदवीपेक्षा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर छळाचा आरोप केल्याची शिक्षाच त्यांना दिली गेली असल्याची चर्चा आहे.Woman who alleged Sanjay Raut sentenced to one and a half months in jail in fake degree case, High Court finally grants bail

पोलीसांनी ८ जून रोजी अटक केल्यापासून त्या तुरुंगात होत्या. अखेर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून आपला छळ होत असल्याचा आरोप चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांनी केला होता.



त्यानंतर पोलीसांनी त्यांच्यावर क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये बनावट पीएचडी घेऊन प्रॅक्टीस करत असल्याच्या प्रकरणात अटक केली. तेव्हापासून त्या तुरुंगात होत्या.न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने पाटकर यांची २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील बाळकडू या चित्रपटाच्या डॉ. स्वप्ना पाटकर निर्मात्या आहेत. ३० मार्च २०२१ रोजी त्यांनी ट्विटरद्वारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. संजय राऊत गेल्या आठ वर्षांपासून शिवसेना पक्षातील त्यांचे स्थान आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत मला धमक्या आणि शिवीगाळ करत आहेत.

इतकेच नाही तर माझे कुटुंब, माझा मित्रपरिवार, नातेवाईक यांनाही ते त्रास देत आहेत. काही ना काही आरोप माझ्यावर ठेवत पोलिस स्टेशनला मला चौकशीसाठी बोलावले जात आहे. यामुळे मी खूपच त्रस्त झाले आहे., असा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला होता.

दोन पानांचे पत्र लिहून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र, राष्ट्रपती भवन, प्रियंका गांधी, स्मृति इराणी, निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक नेत्यांना टॅग केले होते. आपल्याला कुणी आपल्याला मारून टाकण्याआधी न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली होती.

हे पत्र पाठविल्यावर स्वप्ना पाटकर यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या. मंगळवारी बनावट डॉक्टर पदवी प्रकरणात वांद्रे पोलिसांनी त्यांना अटक केली. त्कानपूर विद्यापीठातून स्वप्ना पाटकर यांनी डॉक्टरेट पदवी मिळविल्याचा दावा तक्रारदार गुरदीप कौर यांनी केला आहे.

कानपूर विद्यापीठातील छत्रपती शाहूजी महाराज विश्व विद्यालय, कानपुर येथून २००९ साली मानसशास्त्र विषयात पीएचडी केल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून घातले. लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे आॅनररी कन्सल्टन्ट म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्र खरे म्हणून वापरले. स्वत:ला डॉक्टर असल्याचे भासवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या गुरदीप कौर यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवली होती.

स्वप्ना पाटकर या प्रोफेशनली सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांची द रॉयल मराठी एंटरटेनमेंट नावाची निर्मिती संस्था असून त्याच्या त्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. याशिवाय त्यांनी २०१३ मध्ये मराठीत पुस्तकही लिहिले आहे. त्यांची निर्मिती असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बाळकडू हा मराठी चित्रपट सहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.

त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे या चित्रपटाचे सादरकर्ते खासदार संजय राऊत होते.पाटकर यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते की, पाटकर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. संजय राऊत यांनी आपली छळवणूक केल्याचा आरोप पाटकर यांनी केला आहे.

Woman who alleged Sanjay Raut sentenced to one and a half months in jail in fake degree case, High Court finally grants bail

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात