कलम ३७० हटविल्याने काश्मीर फाईल्सच्या वेदनेवर फुंकर, दोन वर्षांत २०१५ काश्मीरी पंडित पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवून काश्मीर फाईल्स रिवार्इंड करायला सुरूवात केली आहे. पंतप्रधान विकास पॅकेजचा लाभ घेऊन गेल्या दोन वर्षांत २१०५ काश्मीरी पंडित जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा परतले आहेत. त्यांना शासकीय नोकऱ्याही देण्यात आल्या आहेत.With the deletion of section 370,Kashmir  files are revinding, in two years 2015, Kashmiri Pandit is back in Jammu and Kashmir.

तीस वर्षांपूर्वी काश्मीरी पंडितांना आपले सर्वस्व सोडून जम्मू काश्मीर सोडावे लागले होते. त्याचे वेदनादायी चित्र नुकत्याच आलेल्या काश्मीर फाईल्स या चित्रपटात पाहायला मिळाले आहे. या सगळ्या वेदनांवर फुंकर घालण्याचे काम मोदी सरकारने कलम ३७० हटवून केले आहे.



गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की पंतप्रधान विकास पॅकेजनुसार आत्तापर्यंत २१०५ शासकीय नियुक्ती देण्यात आल्या आहेत. २०१९ मध्ये कलम ३७० हटविण्यात आले. त्यानंतर काश्मीरी पंडितांना पुन्हा आपल्या मायभूमीत जाणे शक्य झाले आहे.

गेल्या दोन वर्षांत दहशतवाद्यांनी चार काश्मीरी पंडितांची  हत्या केली. मात्र, यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत एकाही हिंदूंची हत्या झालेली नाही. गेल्या पाच वर्षांत १७७ नागरिक आणि ४०६ सुरक्षा सैनिकांची हत्या करण्यात आली.

कलम ३७७ हटविल्याचा सर्वाधिक फायदा म्हणजे काश्मीरमध्ये पाकिस्तानातून होणाऱ्या  घुसखोरीच्या घटनांत घट झाली आहे. २०१७ मध्ये घुसखोरीच्या १३६ घटना घडल्याहोत्या. २०१८ मध्ये १४३ होत्या. २०१९ मध्ये १३८, २०२० मध्ये ५१ तर २०२१ मध्ये केवळ ५१ घटना घडल्या आहेत.

With the deletion of section 370, Kashmir files are revinding, in two years 2015, Kashmiri Pandit is back in Jammu and Kashmir.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात