येडीयुरप्पा : युग संपले; अध्याय संपणार का..? हा प्रश्न पडण्याची ही आहेत महत्त्वाची कारणे…


विशेष प्रतिनिधी

कर्नाटक : कर्नाटकचे मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकात भाजप म्हणजेच येडीयुरप्पा असे जणू समीकरणच गेल्या दोन दशकांत दृढ झाले होते. त्यांच्या राजीनाम्याने कर्नाटकच्या राजकारणात एका अध्यायाची सांगता झाल्याचे मानले जाते. Why Yeddyurappa is still so important for BJP in Karnataka?

अर्थात त्यांच्या केवळ राजीनाम्याने प्रश्न संपणार नसून आगामी काळात त्यांनी बंड न करता पक्षाचे काम करणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना सर्व ती काळजी घ्यावी लागणार आहे. कारण येडीयुरप्पा यांच्यात बंड करण्याची अजूनही धमक आहे. भाजप सारख्या बलाढ्य पक्षासाठी येडीयुरप्पा अजूनही इतके का महत्वाचे नेते आहेत की ज्यांच्याविना कर्नाटकात भाजपचे पानही हलू शकत नाही हे जाणून घेणे महत्वाचे आहे. 

१) कर्नाटकात जातीच्या समीकरणांना कमालीचे महत्व आहे. येडीयुरप्पा यांच्यामागे लिंगायत समाजाची सारी एकमुखी ताकद आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी पक्षाला लिंगायत समाजाची तब्बल ८७ टक्के मते मिळाली होती. वक्कलिंग व ब्राम्हण समाज हा देखील कर्नाटकात महत्वाचा मानला जातो. पण लिंगायत समाज हा तुलनेने निर्णायक समाज आहे.

२) लिंगायत समाज हा पक्ष म्हणून भाजपच्या पाठीशी कधीही ठामपणे उभा रहात नाही मात्र तो येडीयुरप्पा यांच्या मागे उभा राहतो. त्याचा आपसुख भाजपला फायदा होतो. हे याआधीही सिद्ध झाले आहे. येडीयुरप्पा यांनी २०१३ मध्ये बंडखोरी करून जेव्हा कर्नाटक जनता पक्ष काढला होता. त्यावेळी सारा लिंगायत समाज येडीयुरप्पांच्या पाठीशी उभा राहिला होता. त्यावेळी भाजपला याचा जबर फटका बसला होता.

३) गेल्या आठवड्यापासून लिंगात समाजाच्या सर्व प्रमुख स्वामींनी व मठाधिपतींनी येडीयुरप्पा यांच्या मागे सारी ताकद असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. कर्नाटकमध्ये मठांना व त्यांच्या प्रमुखांना राजकारणात अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे येडीयुरप्पा यांना थेट डावलणे भाजपला परवडणारे नाही.

४) दक्षिण भारतात आतापर्यंत केवळ कर्नाटकातच भाजपला एकहाती सत्ता स्थापन करता आली आहे आणि याचे सारे श्रेय येडीयुरप्पांनाच जाते. आजही त्यांची ताकद तितकीच मोठी आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून ते पायउतार झाले असले तरी राज्याच्या राजकारणात ते अजूनही ताकदवान नेते म्हणून कार्यरत राहणात यात शंका नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना त्यांच्याकडे लक्ष द्यावेच लागणार आहे. म्हणून तर येडीयुरप्पांचा उत्तराधिकारी म्हणून बसवराज बोम्मई यांनाच मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी लागली आहे. बोम्मई हे देखील लिंगायत आहेत आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे ते येडीयुरप्पांच्या अतिशय विश्वासातील आहेत.

Why Yeddyurappa is still so important for BJP in Karnataka?

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण