विनायक ढेरे
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि मुंबईच्या 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमन याला रितसर खटला चालवून 2015 मध्ये फाशी दिल्यानंतर 7 वर्षांनी त्याच्या कबरीच्या सुशोभीकरणाचा विषय आत्ताच का निघाला?? त्यावर शिवसेनेपासून काँग्रेसपर्यंत आणि कम्युनिस्टांपासून एआयएमआयएम पर्यंत सर्व पक्ष प्रतिक्रिया व्यक्त का करत आहेत??… या गौडबंगालाचा शोध घेण्याची खरी गरज आहे. Why the subject of exaltation of Yakub Memon’s grave has come up now
याकूबच्या अंत्ययात्रेत मोठा मुस्लिम समुदाय
याकूब मेमन याला 2015 मध्ये फाशी दिल्यानंतर कायद्यानुसार त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या हाती सोपविला होता. त्यांनी त्याच्या मृतदेहाचे दफन मुंबईतल्या कब्रस्तान मध्ये केले होते. याकुबच्या अंतयात्रेत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समुदाय जमला होता. त्यावेळी त्याच्या बातम्याही मोठ्या झाल्या होत्या. पण त्यानंतर याकूब मेमनचा विषय संपला होता. 2022 मध्येच हा विषय एकदम कसा काय वर आला?? याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण, तिथे एलईडी लाईट लावणे वगैरे विषय कसे वर आले??, याचा नीट विचार करण्याची गरज आहे.
आरोप प्रत्यारोपांचा गदारोळ
सर्वच राजकीय पक्षांनी विशेषतः महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी भाजपवर आणि भाजपने शिवसेनेतल्या ठाकरे गटावर आरोप – प्रत्यारोप केले आहेत. काँग्रेस नेत्यांनी तर मुळात याकूब मेमनचा मृतदेह महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविला होता. मूळात तो सोपवलाच का?? असा सवाल केला आहे. किंबहुना याकूब मेमनच्या कबरीचा विषय त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवणे या मुद्द्याभोवतीच खऱ्या अर्थाने केंद्रित आहे. या विषयाची नीट अभ्यास केला पाहिजे आणि तो राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलिकडे जाऊन केला पाहिजे.
ओसामाप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट शक्य!!
एखाद्या दहशतवाद्याला रितसर खटला चालवून फाशी दिल्यानंतर कायद्यानुसार त्याचा मृतदेह वारसांकडे म्हणजेच त्याच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात येतो. ज्यावेळी ओसामा बिन लादेन याचा खात्मा केला होता त्यावेळी अमेरिकेने त्याचा मृतदेह कोणाहीकडे सोपविला नव्हता. उलट तो समुद्रात अज्ञात ठिकाणी पाण्यात सोडून दिला होता. जेणेकरून त्याची कोणताही कोणतीही स्मृतीशेष म्हणजे आठवण उरता कामा नये. याची “व्यवस्था” अमेरिकेने केली होती. याकूब मेमनचा कबरीचा विषय निघाल्यानंतर जे प्रश्न विचारले गेले आहेत की याकूब मेमन सारख्या दहशतवाद्याचा मृतदेह हा नातेवाईकांकडे सोपवलाच कसा??, त्याच्या कबरीचे उदातीकरण होणार असल्याची शंका त्यावेळच्या सरकारला का आली नाही??, हे प्रश्न विचारण्यातून एखादा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे का?? की इथून पुढे कोणत्याही दहशतवाद्याचा मृतदेहाची अज्ञातस्थळी सरकारनेच विल्हेवाट लावायची, असे भारतात होऊ शकेल का?? तशा निर्णयाच्या दिशेने हा विषय चालला आहे का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ओसामाचाच “न्याय” इतरांना लावा
अन्यथा ऐन गणेशोत्सव सुरू असताना याकूब मेमन याच्या कबरीचे उदात्तीकरण, सुशोभीकरण हा विषय माध्यमांमध्ये येण्याचे कारण काय?? आणि त्यावर सगळे राजकीय पक्ष एकमेकांवर तुटून पडण्याचे देखील कारण काय?? हे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत. आणि या प्रश्नांचे उत्तर खरंच हवे असेल, तर अमेरिकेने जे ओसामा बिन लादेन याच्या बाबतीत केले, तेच भारताला छळणाऱ्या दहशतवाद्यांच्या बाबतीत भारत सरकारने केले पाहिजे हाच त्यावरचा उपाय ठरू शकतो!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App