विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने आयव्हरमेक्टिन या औषधाच्या वापरावरून खबरदारीचा इशारा दिला आहे. मागील दोन महिन्यांमध्ये आरोग्य संघटनेने सलग दुसऱ्यांदा या औषधाच्या वापराबाबत इशारा दिला आहे. या औषधाच्या सेवनामुळे मृत्यूदर कमी होतो किंवा रुग्णांचे रुग्णालयांत दाखल होण्याचे प्रमाण देखील कमी होते हे दर्शविणारे फार कमी पुरावे हाती आल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. WHO warns regarding some drug use
एखाद्या औषधाचा वापर केला जात असताना त्याची सुरक्षितता आणि परिणामकारकता या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. हे औषध फक्त क्लिनिकल ट्रायल्समध्ये वापरले जायला हवे, या औषधाचा सरसकट वापर केला जाऊ नये, असे आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे आयव्हरमेक्टिनची उत्पादक कंपनी असणाऱ्या एमएसडीने देखील काहीसा अशाच प्रकारचा इशारा दिला आहे. या औषधाच्या वापरानंतर आमच्या हाती येत असलेल्या सर्व निष्कर्षांचा आम्ही काळजीपूर्वक अभ्यास करत आहोत, असे उत्पादक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App