इम्रान खान यांना सुनावणारी स्नेहा आहे तरी कोण?


संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानी इम्रान खान यांनी भारतविरोधी गरळ ओकली. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच स्नेहा दुबे या तरुण भारतीय डिप्लोमँटने जे जोरदार प्रत्युत्तर दिले ते ना इम्रान खान यांना अपेक्षित होते ना पाकिस्तानला. कर्तव्यकठोर स्नेहा दुबे आहे कोण? Who is Sneha Dubey who tore into Pakistan PM Imran Khan at UN? India wants to know


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली ः पाकिस्तानची दहशतवादाचा पुरस्कार करणारी परंपरा, पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांची होणारी ससेहोलपट याचा नेमका आणि टोचणारा उल्लेख पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासमोरच संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत भारताकडून झाला. हा हजरजबाबीपणा दाखवला तो संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी.

या घटनेनंतर स्नेहा यांच्या कणखर वृत्तीचे कौतुक सर्वत्र सुरु झाले आहे. त्यांच्या भाषणानंतर थोड्याच वेळात सोशल मिडियात लाखो भारतीयांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. अत्यंत तरुण वयात त्यांनी ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या आगळिकीचा सामना केला, ज्या कर्तव्यकठोरतेने आणि जबाबदारीने भारताची बाजू जगासमोर मांडली त्याबद्दल त्यांची प्रशंसा होत आहे.



स्नेहा या 2012 च्या बँचच्या आयएफएस अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण त्यांनी गोव्यातून पूर्ण केले. पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी त्यांचे उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर दिल्लीच्या जवाहललाल नेहरु विद्यापीठातील स्कुल ऑफ इंटरनँशनल स्टडीज मधून त्यांनी एमफील पूर्ण केले.

ट्वीटरवर स्नेहा यांच्याबद्दल एका नेटकऱ्याने ट्वीटरवर म्हटले आहे, “व्वा. कशी बंद केली पाकिस्तानी विदूषकांची तोंडं बंद…त्यांनी प्रत्येक शब्द इतका काळजीपूर्वक निवडला होता…वास्तववादी…खूपच भारी.” काही ट्वीटरकर्त्यांनी त्यांची तुलना यापूर्वीच्या यूएनमधल्या भारतीय प्रतिनिधींशी केली आहे. “संयुक्त राष्ट्रसंघातल्या भारतीय महिला कर्तुत्त्ववान आहेत. एनम गंभीर, विदिशा मैत्रा आणि आता ही तोडीस तोड जबाब देणारी जहाल तरुणी स्नेहा दुबे. ”

Who is Sneha Dubey who tore into Pakistan PM Imran Khan at UN? India wants to know

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात