विकास प्रकल्पांमधील अडथळे कोण?, कोठे?; मोदींनी मागवली यादी; वाढत्या खर्चाबद्दल चिंता; गुजरात – महाराष्ट्रावर कटाक्ष


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यायालये आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) निर्णयांमुळे अडकून पडलेल्या मोठ्या विकास प्रकल्पांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांसंदर्भात माहिती मागवली आहे.Who are the obstacles in development projects ?, where ?; List ordered by Modi; Concerns about rising costs; Gujarat – A look at Maharashtra

त्यांनी मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना सर्व मंत्रालायांशी समन्वय साधून यासंदर्भातील माहिती मिळविण्याचे आदेश दिले आहेत. २५ ऑगस्ट रोजी झालेल्या एका आढावा बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी विकासकामांमध्ये येणारे अडथळे, अडकून पडलेल्या योजनांची यादी बनवण्यास तसेच सरकारी संपत्तीला या स्थगितीमुळे होणाऱ्या नुकसानीची नेमकी माहिती घेऊन अहवाल सादर करण्यास मोदींनी सांगितले आहे.यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही समावेश आहे.



मोदींनी चार मंत्रालयांच्या मंत्रालय सचिवांना एकत्र काम करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर सरकार काय निर्णय घेणार आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र पंतप्रधानांनी यामध्ये कायदा मंत्रालयाला यामध्ये सहभागी करुन घेण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. यातून अडकून पडलेल्या प्रकल्पांमधले कायदेशीर अडथळे दूर करून या प्रकल्पांचे काम मार्गी लावण्याचा सरकारचा मनसूबा दिसतो आहे.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमधील मुख्यम मुद्द्यांमध्ये, ‘पर्यावरण, जंगलं आणि जलवायू परिवर्तन, रेल्वे आणि रस्ते परिवहन तसेच राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने कायदा आणि न्याय मंत्रालयासोबत चर्चा करुन जमीन अधिग्रहण, जंगलं तसेच अन्य संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालय, एनजीटीकडून सुनावण्यात आलेल्या निर्णयांचा अभ्यास केला पाहिजे.

ज्या निर्णयांमुळे प्रकल्प रखडलेत त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. मंत्रालय सचिवांना या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवलं पाहिजे. न्यायालयाच्या आदेशांमुळे रखडलेल्या सार्वजनिक कामांच्या योजना, सरकारला यामुळे होणारे नुकसान याची माहिती सुद्धा मंत्रालय सचिवांनी जमा करावी,’ असे सांगितले आहे.

या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी मंत्रालय सचिवांना एका आठवड्यामध्ये अशा प्रकल्पांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत जे सरकारी अधिकारी आणि प्राधिकरणांनी केलेल्या दिरंगाईमुळे रखडले आहेत.

मंत्रालय सचिवांनी रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार करुन ते रखडण्यामागे कोणत्या संस्था आणि अधिकारी आहेत हे शोधून काढलं पाहिजे. ही यादी एका आठवड्यामध्ये जमा करावी, असे निर्देश २५ ऑगस्टच्या बैठकीमध्ये देण्यात आले होते. याच बैठकीमध्ये मोदींनी देशातील ८ महत्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले.

२५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी वेस्टर्न डेडीकेटेड फ्रण्ट कॉरिडोअर प्रोजेक्टला होत असणाऱ्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलंय. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला ध्येय निश्चित करुन देण्यात आले होते.

२५ ऑगस्ट रोजी मोदींनी १५ सप्टेंबर २०२१ पासून दिल्ली शहरातील रस्त्यांच्या विस्तार करण्याचं काम रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने हाती घ्यावं असं सांगितलं होतं. मंत्रालयांनी वेगाने कामं केली पाहिजेत आणि अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट २०२३ आधी योजना पूर्ण केल्या पाहिजेत असंही सांगण्यात आलं.

पंतप्रधानांनी विकासकामासंदर्भातील प्रकल्पांमध्ये होणारा उशीर आणि वाढणाऱ्या खर्चासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. फेब्रुवारीमधील बैठकीमध्ये मोदींनी काम पूर्ण करण्याऐवजी टप्प्याटप्प्यांमध्ये हाती घेतलेली विकासकामं मार्गी लावण्याची व्यवस्था बसवण्याचे निर्देश दिले होते. राज्यांनी या प्रकल्पांचे काम वेगाने करावे आणि त्यासंदर्भातील अहवाल वेळोवेळी सादर करावेत असं मोदींनी यावेळी म्हटलं होतं.

Who are the obstacles in development projects ?, where ?; List ordered by Modi; Concerns about rising costs; Gujarat – A look at Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात