दिल्ली झाली; आता ममता बॅनर्जी यांचा गोव्यातून विरोधी ऐक्याचा हुंकार


वृत्तसंस्था

कोलकाता :  दिल्ली झाली अाता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्यातून विरोधी ऐक्याचा हुंकार भरण्याचे ठरविले आहे. ममता बॅनर्जी यांचा गोवा दौरा आधीच निश्चित झाला आहे. पण त्यांनी आता स्वतः ट्विट करून गोव्यातल्या सर्व भाजप विरोधी पक्षांना एकजूट करून भाजपचा पराभव करण्याचे आवाहन केले आहे. येत्या 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत ममता बॅनर्जी या गोव्यात मुक्कामाला आहेत. तेथे त्या नव्याने विरोधी ऐक्याचा प्रयत्न करतील. West Bengal Chief Minister and Trinamool Congress leader Mamata Banerjee to visit Goa on 28th October, ahead of 2022 Assembly elections

या आधी ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत पाच दिवसांचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या.ममतांच्या या भेटी झाल्या तरी सर्व विरोधकांच्या “राजकीय गाठी” जोडल्यास गेले असतील याची खात्री कोणी देऊ शकलेले नाही. दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेऊन आल्यानंतर महिना दोन महिन्यातच त्यांनी आसाम मध्ये काँग्रेस फोडून सुष्मिता देव यांना तृणमूल काँग्रेस मध्ये घेतले. तसेच अनेक काँग्रेस नेत्यांना तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ झाले. तरी देखील विचलित न होता ममता बॅनर्जी यांनी विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न सोडले नाहीत.

आता त्या गोव्यात विरोधकांचे ऐक्य सांधण्याचा प्रयत्न करणार आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांना काँग्रेसमधून फोडून तृणमूळ काँग्रेसचे उपाध्यक्ष नेमले आहे. त्यांच्याकरवी जग्या त्या गोव्यामध्ये तृणमूल काँग्रेसची पक्ष संघटना बांधू इच्छितात. फालेरो यांचा गोव्यातल्या ख्रिश्चन मतांवर विशिष्ट प्रभाव आहे. त्याचा उपयोग ममता बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेसच्या संघटना बांधणीसाठी होऊ शकतो. त्यामुळेच त्यांनी पश्चिम भारतावर लक्ष केंद्रित करताना गोव्याची निवड केल्याचे मानले जात आहे.

गोव्यात गेल्या दहा वर्षात भाजपचा राजवटीत गोवेकर जनतेला वाईट भोग भोगावे लागले. त्यांची यातून सुटका करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर करून आपल्या गोवा राजकीय उद्देशच जाहीर केला आहे.

West Bengal Chief Minister and Trinamool Congress leader Mamata Banerjee to visit Goa on 28th October, ahead of 2022 Assembly elections

हत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण