West Bengal Cabinet : पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाने सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे विधान परिषद बनवण्याच्या निवडणुकीतल्या आश्वासनाला मंजुरी दिली आहे. ममता यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वयाच्या अटीमुळे तिकीट न दिलेल्या ज्येष्ठ नेत्यांसाठी विधान परिषद बनवण्याचे आश्वासन दिले होते. पश्चिम बंगालमध्ये सध्या 294 सदस्यीय विधानसभा आहे, परंतु राज्यात विधान परिषद नाही. West Bengal Cabinet Approves To Create Legislative Council in State
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाने सोमवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे विधान परिषद बनवण्याच्या निवडणुकीतल्या आश्वासनाला मंजुरी दिली आहे. ममता यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वयाच्या अटीमुळे तिकीट न दिलेल्या ज्येष्ठ नेत्यांसाठी विधान परिषद बनवण्याचे आश्वासन दिले होते. पश्चिम बंगालमध्ये सध्या 294 सदस्यीय विधानसभा आहे, परंतु राज्यात विधान परिषद नाही.
एका मंत्र्याने सांगितले की, “मंत्रिमंडळाने आज विधान परिषद स्थापण्यास मान्यता दिली.” हे आता राज्यपालांना पाठविले जाईल आणि त्यांच्या मंजुरीनंतर ते आवश्यक संमतीसाठी राज्य विधानसभेत पाठवले जाईल.” विधान परिषदेची स्थापना किंवा विघटन करण्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार राज्य विधानसभेचा ठराव मंजूर होणे आवश्यक आहे, ज्यास बहुसंख्य सभागृहाने पाठिंबा देणे आवश्यक आहे.
आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशात विधान परिषदा अस्तित्वात आहेत. या परिषदेस वरिष्ठ सभागृह असेही म्हणतात. यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्येही विधान परिषद होती परंतु केंद्रशासित प्रदेश स्थापल्यानंतर त्याची मान्यता गेली.
विधान परिषद ही राज्यांमध्ये लोकशाहीतील वरिष्ठ प्रतिनिधी सभेच्या नावाने ओळखली जाते. याच्या सदस्यांची निवड अप्रत्यक्षपणे होते. राज्यपालही काही सदस्यांची नेमणूक करत असतात.
West Bengal Cabinet Approves To Create Legislative Council in State
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App