स्नेहा दुबे या तरुण भारतीय डिप्लोमँटने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जागतिक व्यासपीठावर तिने ज्या पद्धतीने पाकिस्तानची खरडपट्टी काढली त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाचे व्यासपीठही स्तब्ध झाले. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा दुतोंडी चेहरा जगासमोर आणताना स्नेहा यांनी जराही ‘स्नेह’ दाखवला नाही. “We keep hearing that Pakistan is a ‘victim of terrorism’; this is the country which is an arsonist disguising itself as a fire-fighter,” said young Indian diplomat Sneha Dubey at the UNGA session, slamming Pakistan’s Imran Khan for highlighting the Kashmir issue in his speech.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राच्या महासभेत (यूएनजीए) पाकिस्तान नेहमीच दांभिकता दाखवतो. कथनी आणि करणीमधला विरोधाभास ही पाकिस्तानची परंपरा आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकची हीच दुतोंडी भूमिका पुढे नेली. इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. पण त्यानंतर काहीच क्षणात भारताने इम्रान खान यांचे दात त्यांच्याच घशात घालणारे प्रत्युत्तर दिले.
भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी युनजीएच्या अधिवेशनात प्रत्युत्तर देताना सुनावले, “शेजार देश पाकिस्तान स्वतःला “अग्निशामक” म्हणवून घेत असला तरी प्रत्यक्षात ते स्वत:च जाळपोळ करणारे आहेत.” इम्रान खान बोलल्यानंतर काही क्षणातच भारताने प्रत्युत्तर दिले. “आम्ही ऐकत राहतो की पाकिस्तान ‘दहशतवादाचा बळी ’आहे. मात्र हा देश स्वतःला अग्निशामक म्हणवून घेत असला तरी जाळपोळ करण्यात हे स्वतःच पुढे असता. असली असत्य विधाने वारंवार करणाऱ्या खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेचा आपण सामुहिकरित्या निषेध केला पाहिजे तसेच त्यांच्या खोटेपणाबद्दल कणवही बाळगली पाहिजे. पाकिस्तानचा खोटेपणा थेट रेकॉर्डवर आणण्यासाठी मी या व्यासपीठाचा वापर करत आहे.”
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या भाषणात भारताच्या कलम 370 रद्द करण्याच्या 5 ऑगस्ट 2019 च्या निर्णयावरुन भाष्य केले होते. ते म्हणाले की, या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाले. पाकिस्तान समर्थक फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या मृत्यूचा मुद्दाही इम्रान खान यांनी मांडला. काश्मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर खोटेपणा करण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ नव्हती. मात्र आजवर त्यांच्या या प्रयत्नांना जागतिक समुदाय आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. काश्मीर ही दोन देशांमधील द्विपक्षीय बाब असल्याचे मत बव्हंशी आंतरराष्ट्रीय समुदायाने मांडले आहे.
दुबे म्हणाल्या की, “माझ्या देशातील अंतर्गत बाबी येथे मांडून या प्रतिष्ठित व्यासपीठाची प्रतिमा डागाळण्याचा पाकिस्तानी पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या आणखी एका प्रयत्नाला भारत सडेतोड उत्तर देईल. इम्रान खान आता अगदी जागतिक मंचावरही खोटे बोलत आहेत, असे त्यांनी सांगितले. आपला सशक्त प्रतिवाद चालू ठेवताना दुबे पुढे म्हणाल्या की, पाकिस्तान हा असा देश आहे जिथे दहशतवाद्यांना मोफत प्रवेश मिळतो. तो असा देश आहे जो शेजारी देशाच्या जनतेचे नुकसान होईल या आशेने या अतिरेक्यांचे पालनपोषण करत राहतो. आमचा देश आणि खरं तर संपूर्ण जगच पाकच्या या धोरणांमुळे त्रस्त आहे…आणि दुसऱ्या बाजूला हाच पाकिस्तान त्यांच्याच देशातील सांप्रदायिक हिंसाचाराची संभावना दहशतवादी कृत्य अशी करतो.
दुबे यांनी सांगितले की, जिथे संपूर्ण जागतिक समुदाय दहशतवादाला पुरस्कृत करण्यात पाकिस्तानच्या भूमिकेवर कडक नजर ठेवून असतानाही पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवादावर केलेल्या टिप्पण्या अनावश्यक आहेत. केंद्रशासित प्रदेश जम्मू -काश्मीर आणि लडाख हे “भारताचे अविभाज्य भाग आहेत होते, आणि नेहमीच असतील.” यात पाकिस्तानच्या बेकायदेशीर क्षेत्राचाही समावेश आहे. आम्ही पाकिस्तानला त्यांची अवैध सर्व क्षेत्रे त्वरीत रिकामी करण्याचे आवाहन करतो.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App