प्रतिनिधी
मुंबई : यंदा ऐन दिवाळीत म्हणजे आज 25 ऑक्टोबर 2022 रोजी सूर्यग्रहण होत आहे. या वर्षातले हे शेवटचे ग्रहण सुरू झाले आहे. 2022 मधील हे पहिले सूर्यग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. 1995 मध्ये दिवाळीत असे सूर्यग्रहण झाले होते. Watch solar eclipse, enjoy but be careful, stay safe
आज भारतात सूर्यग्रहण सायंकाळी 4:09 वाजता सुरू झाले असून आणि संध्याकाळी 6.09 वाजता संपेल. सूर्यास्त ग्रहणातच होणार आहे. त्यामुळे ग्रहण मोक्ष कळणार नाही.
अशी घ्या काळजी
विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्मातून पाहावे.
ग्रहणांबद्दल समाजात अजूनही पारंपारिक समजुती आहेत. परंतु खगोल शास्त्रात त्यांना कसलाही आधार नाही. त्यामुळे, डोळ्यांची योग्य ती काळजी घेऊन सूर्यग्रहण पाहिल्यास त्यापासून कोणासही कधीही, कसलाही अपाय नाही. सूर्य प्रकाशातील अतिनील किरणांनी डोळ्यांतील कॉर्निया या नाजूक पटलास इजा होऊन दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आजचे खंडग्रास सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता साधा विज्ञानाचा प्रयोग करून घरच्याघरी, किंवा विशिष्ट प्रमाणित केलेल्या चष्मातून पाहा.
सूर्यापासून येणारी किरणे डोळ्यांसाठी घातक आहेत. ते दृष्टी पटलाला कायमस्वरूपी इजा करू शकतात. दुर्बीण किंवा एक्सरेद्वारे सूर्याकडे बघणेही घातक आहे.
‘सोलार एक्लिप्स गॉगल’ सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वांत सुरक्षित आहेत. परंतु गॉगल डोळ्याला लावून मगच सूर्याकडे पाहावे आणि सूर्याकडून नजर हटवल्यावर मगच गॉगल डोळ्यावरून बाजूला करावा.
बाजारात सध्या कमी दर्जाचे, स्वस्त गॉगल आले आहेत. परंतु अशा कमी दर्जाच्या गॉगलमुळे तुमच्या डोळ्यांना इजा पोहचू शकते. टेलिस्कोपद्वारे ग्रहण प्रत्यक्ष बघायचे असेल किंवा कॅमेराने फोटो काढायचे असतील, तर बाजारात मिळणारे सोलार फिल्टर टेलिस्कोप किंवा कॅमेराच्या पुढे लावूनच निरीक्षण करावे.
पंजाब: अमृतसर के आसमान में सूर्य ग्रहण दिखाई दिया।#SolarEclipse pic.twitter.com/PcDGM1ZX0k — ANI_HindiNews (@AHindinews) October 25, 2022
पंजाब: अमृतसर के आसमान में सूर्य ग्रहण दिखाई दिया।#SolarEclipse pic.twitter.com/PcDGM1ZX0k
— ANI_HindiNews (@AHindinews) October 25, 2022
आंशिक सूर्य ग्रहण चल रहा है, जो पूर्वोत्तर के कुछ हिस्सों को छोड़कर भारत के अधिकांश हिस्सों में दिखाई देगा। तस्वीर दिल्ली से है।#SuryaGrahan pic.twitter.com/oGG6CX2eaw — ANI_HindiNews (@AHindinews) October 25, 2022
आंशिक सूर्य ग्रहण चल रहा है, जो पूर्वोत्तर के कुछ हिस्सों को छोड़कर भारत के अधिकांश हिस्सों में दिखाई देगा। तस्वीर दिल्ली से है।#SuryaGrahan pic.twitter.com/oGG6CX2eaw
असे पाहा घरच्या घरी सूर्यग्रहण
एक बाय एक फूट आकाराचा पुठ्ठा घेऊन त्याला मध्यभागी एक इंच त्रिजेचे वर्तुळाकार छिद्र पाडावे. भिंत किंवा पडदा आणि दुसऱ्या बाजूला एक छोटा सपाट आरसा यामध्ये छिद्र पाडलेला पुठ्ठा धरावा. सूर्यग्रहण काळामध्ये सूर्याचे प्रतिबिंब सपाट आरशात पडून ते परावर्तित होऊन , पुठ्ठ्याच्या छिद्रातून भिंतीवर किंवा पडद्यावर पडेल, अशी योजना करावी. सूर्यग्रहण लागल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत सूर्याकडे न पाहताही, सूर्यग्रहणाचे अवलोकन करता येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App