Bengal Assembly Elections Results : बंगालमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेस येथे तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. अद्याप निकाल पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही आणि परंतु येथे हिंसाचारालाही सुरुवात झाली आहे. बंगालमधील आरामबागमधील भाजप कार्यालयाला आग लावल्याची बातमी हाती आली आहे. भाजपने तृणमूलवर आरोप केले आहेत. मात्र, तृणमूलने ते फेटाळले आहेत. Violence erupts with Bengal Assembly Elections Results, Trinamool accused of setting fire to BJP office in Arambagh in Bengal
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : बंगालमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेस येथे तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. अद्याप निकाल पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही आणि परंतु येथे हिंसाचारालाही सुरुवात झाली आहे. बंगालमधील आरामबागमधील भाजप कार्यालयाला आग लावल्याची बातमी हाती आली आहे. भाजपने तृणमूलवर आरोप केले आहेत. मात्र, तृणमूलने ते फेटाळले आहेत.
As West Bengal poll results are being declared, TMC goons are attacking BJP offices & workers. BJP office in Arambagh was set on fire by TMC goons. TMC workers attacked BJP workers in Belaghat, similar incidents happened in Shivpur, Durgapur, Uttar Bardhaman: BJP's Sambit Patra pic.twitter.com/wEcKeVp7bw — ANI (@ANI) May 2, 2021
As West Bengal poll results are being declared, TMC goons are attacking BJP offices & workers. BJP office in Arambagh was set on fire by TMC goons. TMC workers attacked BJP workers in Belaghat, similar incidents happened in Shivpur, Durgapur, Uttar Bardhaman: BJP's Sambit Patra pic.twitter.com/wEcKeVp7bw
— ANI (@ANI) May 2, 2021
आरामबागमधील भाजप कार्यालयात लागलेल्या आगीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या जोशात भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ घालून आग लावल्याचा आरोप आहे.
BREAKING: Violence breaks out in Bengal soon after the #WestBengalElections results were clear. BJP party office in Arambagh is set on fire. Allegation against TMC, TMC denies charge. pic.twitter.com/70LwYTUPuA — Anindya (@AninBanerjee) May 2, 2021
BREAKING: Violence breaks out in Bengal soon after the #WestBengalElections results were clear. BJP party office in Arambagh is set on fire. Allegation against TMC, TMC denies charge. pic.twitter.com/70LwYTUPuA
— Anindya (@AninBanerjee) May 2, 2021
निकाल समोर येताच बंगालमध्ये ठिकठिकाणी हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. कूचबिहारमध्ये भाजपच्या उमेदवाराच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच तेथील भाजपच्या कार्यालयाचीही तोडफोड केल्याच्या बातम्या आहेत.
यापूर्वी दुपारी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी निकाल स्पष्ट होताच कोलकातामधील भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ घातला होता. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा करत भाजप कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तर निवडणूक आयोगाने विजयाचा आनंद साजरा न करण्याच्या कठोर सूचना दिल्या होत्या. असे असूनही टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी महामारीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करून भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ उडाला.
Violence erupts with Bengal Assembly Elections Results, Trinamool accused of setting fire to BJP office in Arambagh in Bengal
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App