बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!

गृहमंत्री अमित शाह यांचा सासाराम दौरा रद्द, भाजपाची बिहार सरकारवर टीका

विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारमधील सासाराम आणि नालंदामध्ये रामनवमीदरम्यान उसळलेला हिंसाचार अद्यापही थांबलेल नाही. आता सासाराममधून हिंसाचाराचे ताजे प्रकरण समोर आले आहे. येथे बॉम्बस्फोट झाला असून, त्यात पाच जण जखमी झाले आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी नालंदामधील बिहारशरीफ येथील पहाडपुरा भागात शनिवारी दोन गट समोरासमोर आले. यावेळी सुमारे गोळीबार झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. Violence continues in Bihar  Bomb blast in Sasaram terror in Nalanda with the sound of gunfire curfew imposed

दुसरीकडे, जिल्हा दंडाधिकारी शशांक शुभंकर यांनी बिहारशरीफमध्ये कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे, तर कलम १४४ आधीच लागू आहे. संपूर्ण शहराचे पोलीस छावणीत रूपांतर झाले होते. रॅपिड अॅक्शन फोर्सही शहरात दाखल झाली आहे.

या सगळ्या दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी पाटणा येथे पोहोचले आहेत. ते रविवारी सकाळी साडेअकरा वाजता दिघा येथील सशस्त्र सीमा बाल (एसएसबी) कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यानंतर नवाडा येथे जातील. तेथून परतल्यानंतर ते दिल्लीला परततील. SSB च्या विविध उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमात गृहमंत्री सहभागी होणार आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांचा सासाराम दौरा रद्द –

विशेष म्हणजे रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सासाराममध्ये आधी दगडफेक आणि जाळपोळ झाली, त्यानंतर नालंदामध्येही आग लागली. हिंसक संघर्षानंतर कलम १४४ लागू केल्यामुळे शाह यांची बिहारमधील रोहतास येथील सासाराम भेट रद्द करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या घटनांवरून भाजपा राज्य सरकारवर हल्लाबोल करत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी म्हणाले की, ‘’बिहारमध्ये काय चालले आहे हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना माहित नाही. पोलीस फ्लॅग मार्च करत आहेत आणि अधिकारी खोटे बोलत आहेत.’’

Violence continues in Bihar  Bomb blast in Sasaram terror in Nalanda with the sound of gunfire curfew imposed

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात