महाराष्ट्रातल्या गावांचा कल हिंदुत्ववादी पक्षांकडेच; काँग्रेस – राष्ट्रवादी पेक्षा भाजप आणि दोन्ही शिवसेना यांची दुप्पट ग्रामपंचायतींवर सत्ता

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमधील 7751 ग्रामपंचायतींपैकी 4935 ग्रामपंचायतींचा निकाल स्पष्ट झाला असून त्यामध्ये बहुतेक ग्रामीण महाराष्ट्राचा कल भाजप आणि दोन्ही शिवसेना अशा हिंदुत्ववादी पक्षाकडेच वळल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांपेक्षा जवळपास दुप्पट ग्रामपंचायत मध्ये भाजप आणि दोन्ही शिवसेना यांची सत्ता आली आहे. Villages in Maharashtra tend towards Hindutva parties

आकडेवारीच्या हिशोबात बोलायचे झाले तर भाजप आणि दोन्ही शिवसेना मिळून हिंदुत्ववादी पक्षांची 2589 ग्रामपंचायतीं मध्ये सत्ता आली आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी यांची 1430 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता आली आहे.

मराठी माध्यमांनी मात्र प्रत्येक पक्षाचा वेगळा निकाल आणि आकडेवारी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अनुकूल ठरेल असेच रिपोर्टिंग केले आहे. जणू काही राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष महाराष्ट्रात इतर राजकीय पक्षांना टक्कर देत असल्याचे चित्र मराठी माध्यमांनी रंगविले आहे.

प्रत्यक्षात वर्षानुवर्षे काँग्रेस आणि काँग्रेसनिष्ठ पक्षांकडे जो ग्रामीण भागाचा कल होता, तो पूर्णपणे आता 360° वळून हिंदुत्ववादी पक्षांकडे झाला असल्याचे 7055 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून म्हणजे मिनी पार्लमेंटच्या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.


Maharashtra Rajya Sabha Elections : ओवेसींचा पक्ष AIMIM महाविकास आघाडीच्या उमेदवाराला करणार मतदान, समजून घ्या गणित


34 जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या 7751 पैकी 4935 जागांचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निकालामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर राष्ट्रवादी हा दुसरा स्थानावर आहे. तर शिंदे गटाने तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस चौथ्या तर शिवसेना ही पाचव्या स्थानावर असल्याचे मराठी माध्यमांचे म्हणणे आहे.

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जात आहे. तरी देखील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर झेंडे फडकवून भाजप आणि शिंदे गटाने आघाडी घेतली आहे, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पिछाडीवर आहे.

 मराठी माध्यमांची मोजणी राष्ट्रवादीला अनुकूल

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाने मोठी आघाडी घेतली आहे. जवळपास 2089 जागांवर आघाडीवर आहेत. महाविकास आघाडी 2006 जागांवर आघाडीवर आहे. अवघ्या काही जागांसाठी कांटे की टक्कर सुरू आहे.

आतापर्यंत 4993 जागांचा निकाल समोर आला आहे. यामध्ये भाजपने 1455 जागांवर आघाडी घेतली आहे, तर शिंदे गटाने 639 जागांवर आघाडी घेतली आहे, तर शिवसेना 495 आणि काँग्रेस 495 गटावर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी शिंदे गटाला भारी पडली आहे. राष्ट्रवादीने 935 जागांवर आघाडीवर आहे. अजूनही मतमोजणी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी पक्षाचे पुरस्कृत हे पॅनल असल्याचे समोर आले आहे. आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा सर्व पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Villages in Maharashtra tend towards Hindutva parties

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात