वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे महाराज हरीसिंह यांचे नातू विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. Vikramaditya Singh, grandson of Maharaj Harisingh of Jammu and Kashmir, slammed the Congress
मंगळवारी त्यांनी काँग्रेस सोडत असल्याचे सांगितले. जम्मू काश्मीर संदर्भात काँग्रेसची आपली अनेक मते जुळत नाहीत. राष्ट्रहिताच्या विचार करता काँग्रेसच्या अनेक मतांशी मी सहमत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे, असे विक्रमादित्य सिंह यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाची नाळ ही जनतेपासून तुटली आहे. पक्ष हा अनेक लोकांच्या भावना समजून घेण्यात अपयशी ठरला आहे. पक्षाचे विचार मला पटतच नाहीत. त्यामुळे मी काँग्रेसला रामराम ठोकत असल्याचे सिंह यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App