विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवणारे भाषण केल्याबद्दल राहुल गांधींना दिलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलेली नाही, तर फक्त स्थगिती दिली आहे. तरी देखील उत्साहाच्या भरात महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडीटीवारांनी अप्रत्यक्षपणे सावरकरांच्या माफीनाम्याचा मुद्दा मध्ये घुसविला. ते गांधी आहेत ते कधी माफी मागत नाहीत, असे वडेट्टीवर म्हणाले. Vijay vadettiwar supportes rahul Gandhi, but raked up savarkar apology issue
देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवणारे भाषण राहुल गांधींनी 2019 मध्ये कर्नाटकात केले होते त्यावरून गुजरात मध्ये पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर खटला दाखल केला होता या खटल्यात सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा दिली त्या शिक्षेवर गुजरात हायकोर्टाने शिक्कामोर्तब केले. पण सुप्रीम कोर्टाने आज त्या शिक्षेला स्थगिती दिली. त्याच वेळी या केस मध्ये राहुल गांधींना एवढी मोठी शिक्षा का दिली??, असा सवाल केला. पण राहुल गांधींनी भाषण करताना काळजी घ्यावी. त्यांचे ते भाषण फार मोठे अभिरुची संपन्न नव्हते अशा कानपिचक्याही सुप्रीम कोर्टाने दिल्या.
पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राहुल गांधींची खासदारकी पुन्हा बहाल होण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळेच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आला. दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. संसदेच्या परिसरात काँग्रेसच्या अनेक खासदारांनी आनंदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या, तसेच महाराष्ट्र विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काँग्रेसच्या नेत्यांनी आमदारांनी आनंद व्यक्त करत एकमेकांना पेढे भरविले.
पण हा आनंद व्यक्त करत असतानाच कालच विरोधी पक्षनेते पदी विराजमान झालेले विजय वडेट्टीवार यांनी मात्र औचित्यभंग केला. कारण नसताना वडेट्टीवारांनी सावरकरांच्या माफीनाम्याचा मुद्दा अप्रत्यक्षपणे समोर आणला. राहुल गांधींना शिक्षा झाली, ती शिक्षक कोर्टाने रद्द केलेली नाही तर फक्त त्याला स्थगिती दिली आहे. पण त्याविषयी आनंद व्यक्त करताना वडेट्टीवारांनी राहुल हे “गांधी” आहेत. ते “माफी” मागत नसतात, अशी दर्पोक्ती केली. त्यातूनच त्यांनी अप्रत्यक्षपणे सावरकरांच्या माफीनाम्याच्या मुद्द्याला हवा दिली. आता भाजपचे नेते वडेट्टीवारांना कसे उत्तर?, देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App