व्यंकटेश प्रसादचे ट्विट…भारत – पाकिस्तान खुन्नस आणि अमीर सोहेलच्या क्लीन बोल्डच्या सोनेरी आठवणी


वृत्तसंस्था

चेन्नई – व्यंकटेश प्रसादचे ट्विट… पाकिस्तानशी ती खुन्नस… आणि अमीर सोहेलच्या क्लीन बोल्ड विकेटच्या सोनेरी आठवणी आज एकदम जाग्या झाल्या… त्याचे असे झाले, की व्यंकटेश प्रसादने रविवारी एक ट्विट केले. यामध्ये त्याने १९९६च्या वर्ल्डकपमध्ये अमीर सोहेलला क्लीन बोल्ड केल्याचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करताना प्रसादने राहुल द्रविडने केलेल्या जाहिरातीमधील कॅप्शन दिली. त्यात त्याने ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर स्वत:ला इंदिरानगरचा गुंड म्हटले होते. Venkatesh Prasad Responds To Journalist On “Only Achievement In His Career”

तसे हे निरूपद्रवी ट्विट होते… पण पाकिस्तानी पत्रकार स्पोर्टस् अँकर नजीब अल् हसन याला राहावले नाही. त्याने प्रसादच्या ट्विटला उत्तर देत, ही प्रसादची एकमेव उत्तम कामगिरी आहे, अशा शब्दांत कुरापत काढली. ट्विटर वॉर एवढ्यावर थांबले नाही. प्रसादने त्याला चपखल उत्तर दिले… नाही नजीबभाई, अजून एक कामगिरी तू विसरलास… वर्ल्डकपमध्ये १९९९ साली इंग्लंडमध्ये मी पाकिस्तानविरुद्ध २७ धावा देत ५ विकेट घेतल्या आणि तेव्हा पाकला २२८ धावांचे लक्ष्य पार करता आले नाही. त्यानंतर नजीबची बोलतीच बंद झाल्याचे दिसले.

भारत – पाकिस्तानची अशी खुन्नस…

१९९६ च्या वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत ८ बाद २८७ धावा केल्या होत्या. नवज्योत सिंग सिद्धूने ९३ तर जडेजाने ४५ रन केल्या होत्या. त्याला उत्तर देताना पाकिस्तानने धमाकेदार सुरुवात केली होती. सोहेल आणि सईद अन्वर यांनी ११ षटकात ८४ धावा केल्या. अन्वर बाद झाल्यानंतर सोहेलची फटकेबाजी थांबली नव्हती. त्याने प्रसादच्या चेंडूवर लाँग ऑफला एक चौकार मारला आणि खुन्नसने इशारा करून पुढील चेंडूवर तेथेच चौकार ठोकणार असल्याचे सांगितले.

पाकिस्तानच्या फटकेबाजीमुळे स्टेडियममध्ये शांतता पसरली होती. पण प्रसादनेही सोहेलचे आव्हान स्वीकारले. आणि त्यानंतरच्या चेंडूवरच प्रसादने त्याचे दांडके उडवले. प्रसादने दांडके उडविल्यानंतर बोल्ड ज्या पद्धतीने सोहेलला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले ती घटना भारतीय चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. प्रसादने या घटनेचा फोटो ट्विट केला.

त्यावर पाकिस्तानी पत्रकार नजीब अल् हसनने त्याला ट्रोल करत तुझ्या करिअरमधील ही एकमेव कमावलेली गोष्ट आहे. त्यालाही प्रसादने सणसणीत प्रत्युत्तर दिले त्याने सर्वांची बोलती बंद झाली.

प्रसाद म्हणाला, नाही नजीब भाई. करिअरमधील कमावलेली गोष्टी मी थोडी शिल्लक ठेवली होती. त्यानंतरच्या वर्ल्डकपमध्ये १९९९ साली इंग्लंडमध्ये मी पाकिस्तानविरुद्ध २७ धावा देत ५ विकेट घेतल्या आणि तेव्हा पाकला २२८ धावांचे लक्ष्य पार करता आले नाही. देवाचे आशीर्वाद तुझ्या सोबत असोत.  या ट्विटर वॉरमुळे भारत – पाकिस्तानमधली ती खुन्नस आणि अमीर सोहेलच्या विकेटच्या सोनेरी आठवणी जाग्या झाल्या.

Venkatesh Prasad Responds To Journalist On “Only Achievement In His Career”

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात