स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या भक्तांनी अंदमान आणि काव्य या दोन “कोठड्यांमध्ये” कोंडून ठेवले आहे, तर सावरकरांच्या काँग्रेसी विरोधकांनी त्यांना माफीनाम्याच्या “कोठडीत” कोंडले आहे. पण सावरकर हे या दोन्ही पलीकडचे विशाल राजकीय, सामाजिक आणि सामरिक व्यक्तिमत्व आहे. त्यांचे राजकीय, सामाजिक, सामरिक तत्त्वज्ञान आणि धोरणे वास्तवावर आधारित असण्याबरोबरच शक्तिसंपन्न भारतासाठी भविष्यवेधी ठरणारी होती, म्हणूनच आज सावरकर भारतीय राजनीतीच्या दृष्टीने “द मोस्ट रेलेव्हंट पॉलिटिकल थिंकर” ठरतात. खरं म्हणजे सावरकर India First या धोरणाचे शिल्पकार होते. Veer Savarkar : driving force of the India First foreign policy of the country
1947 ते 1960 या भारतीय “कबुतरी शांतिप्रिय” धोरणाच्या भ्रमजालाच्या पार्श्वभूमीवर सावरकरांचे India First परराष्ट्र धोरण त्याच्या कठोर वास्तववादी वेगळेपणाने उठून दिसते.
आजच्या परराष्ट्र धोरणाचा पाया
India First हे सावरकरांचे परराष्ट्र धोरण आजच्या मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा पाया म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. किंबहुना ते सुसंगत ठरेल. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सावरकरांना “द फादर ऑफ इंडियन नॅशनल सिक्युरिटी” असे संबोधले, त्यामध्ये त्यांच्याविषयीच्या भक्तिभावापेक्षा वास्तववाद अधिक आहे. कारण सावरकरांचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील एकूण धोरणच त्याला पूरक आणि अनुषंगिक होते.
हिंदू सैनिकीकरण – अग्निवीर योजना
1940 च्या दशकात भारतीय स्वातंत्र्य जवळ येत होते, तेव्हा सावरकरांनी भारतीयांसाठी आखलेले हिंदूंचे सैनिकीकरण धोरण आजच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाची गंगोत्री मानली पाहिजे. कारण सावरकरांनी जेव्हा हिंदूंचे सैनिकीकरण हा विषय सुरू केला, त्यावेळी ब्रिटिश भारतीय सैन्यात मुस्लिमांचे प्रमाण 60 % च्या वर होते. ते हिंदू सैनिकीकरण केल्यानंतर अवघ्या चार वर्षात 70 % – 30 % असे झाले. मोदी सरकारची अग्निवीर योजना ही नव्या परिस्थितीत सावरकरांच्या हिंदू सैनिकीकरणाचा विस्तार आहे.
भारत – चीन – जपान पूर्व आघाडी
इतकेच नाही तर सावरकरांनी तत्कालीन महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांच्या मित्र राष्ट्रांच्या विरोधात अर्थात पाश्चात्य शक्तींविरोधात भारत, चीन आणि जपान अशी पूर्वेकडच्या देशांची प्रबळ “पूर्व आघाडी” उभारण्याची सूचना केली होती. यातला चीन हा माओ झेडॉंगचा कम्युनिस्ट चीन नव्हता, तर चँग कै शेक यांचा राष्ट्रवादी चीन होता, हे इथे अधोरेखित केले पाहिजे. अन्यथा सावरकरांच्या “पूर्व आघाडी” बाबत गैरसमज होऊ शकतो. शिवाय चीनने आपले विस्तारवादी धोरण सुरू करण्यापूर्वीची ही सूचना होती हे सांगणेही इथे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सावरकरांना भारत हा चीन पेक्षा प्रबळ असणे अपेक्षित होते, ही बाब देखील तितकीच किंबहुना सर्वाधिक महत्त्वाची आहे.
भ्रमक शांततावादाला छेद
सावरकरांनी India First या परराष्ट्र नीतीची जी सूत्रे सांगितली, ती पंडित नेहरूंच्या तथाकथित पंचशील आणि शांततावादाला छेद देणारी होती हे उघड आहे. पण ती अधिक वास्तववादी आणि भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक ठळक ठसा उमटवणारी होती, हे देखील तितकेच स्पष्ट आहे. त्यामुळेच त्यांनी “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, अशी तुल्यार मैत्रीची सूचना केली होती. या धोरणातूनच ते हिटलरच्या जर्मनीला शत्रू न मानता ब्रिटिशांच्या विरोधापुरते मित्र मानत होते. हिटलर ब्रिटिशांविरोधात लढतो आहे, याचा अर्थ तो लोकशाही विरोधात लढतो आहे, असा ब्रिटिशांनी लावलेला अर्थ सावरकरांना मान्य नव्हता. उलट हिटलरशी उगाचच तथाकथित तात्विक विरोध न करत बसता भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टीने जर्मनीचा जो उपयोग होईल, तो करून घेण्याकडे सावरकरांचा कल होता.
ब्रिटनच काय पण कोणताही देश लोकशाही, समाजवाद, साम्यवाद असे उच्च तत्वज्ञान मोठ्या तोंडाने बोलत राहतो, पण प्रत्यक्ष कृतीत मात्र तो स्वदेशाचा स्वार्थ कधीच विसरत नाही. त्यामुळे भारतानेही जागतिक शांततेची केवळ उच्चत्वज्ञानात्मक भाषा न वापरता India First हेच धोरण स्वीकारून आंतरराष्ट्रीय राजकारणात वाटचाल करावी, हे परखड सूचना सावरकरांनी तत्कालीन “कबूतरी शांतिप्रिय सरकारचा” मुलाहिजा न बाळगता केली होती. त्याच सूचनेचा पुढे त्यांनी भारत – चीन यांच्या संबंधाविषयी देखील विस्तार केला होता आणि हेच सावरकरांच्या परराष्ट्र धोरणाचे तत्कालीन संदर्भातले वेगळे वैशिष्ट्य ठरले होते.
भ्रामक तत्त्वज्ञानाला विरोध
भारतीय स्वातंत्र्य नजीक येताना अमेरिकेशी व्यापारी आणि सामरिक संबंध वाढविले पाहिजेत, इतकेच नाही तर आधुनिक तंत्रज्ञान अदान प्रदानाचे करार केले पाहिजेत, हा सावरकरांचा आग्रह होता. त्यात उगाच समाजवाद विरुद्ध भांडवलशाही विरुद्ध साम्यवाद या तथाकथित तात्विक वादाला त्यांनी महत्त्व दिलेले नव्हते. त्याउलट भारत कोणत्याही स्थितीत प्रबळ व्हावा यासाठी त्यांनी अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी, शस्त्रास्त्र तंत्रज्ञान आणि अणू तंत्रज्ञान आत्मसात करण्यास थेट पाठिंबा दिला होता. किंबहुना भारताने अणूशक्ती झाले पाहिजे हे सावरकरांचे प्रतिपादन पंडित नेहरूंच्या “केवळ शांततेसाठी अणू” या धोरणाच्या आधीचे होते.
अणूशक्ती पुरवठादार देश
“शांततेसाठी अणू” हे धोरण वरवर पाहता कितीही आकर्षक, उच्चशिक्षित तत्वज्ञान मांडणारे आणि जागतिक शांततेचा पुरस्कार करणारे वाटत असले, तरी आज भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटून गेल्यानंतरही जेव्हा भारत अणू पुरवठादार देशांच्या पंक्तीत बसण्यास धडपडतो आहे, तेव्हा सावरकरांची भारत अणूशक्ती बनण्याची सूचना भारताच्या व्यापारी आणि सामरिक शक्तीच्या दृष्टिकोनातून किती मोलाची होती, हे दिसून येते!!
पण सावरकरांची त्यावेळी मान्य झाली नव्हती. त्या ऐवजी तत्कालीन नेहरू सरकारने 1954 मध्ये कॅनडाशी करार करून भारताला अणूशक्ती बनविण्याचे पहिले पाऊल उचलले होते. पण त्यात भारत अणुबॉम्ब बनवणार नाही, ही अट भारतीय संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाला सर्वार्थाने घातक ठरली होती. आणि सावरकरांचा नेमका याच कथिथ “शांततेसाठी अणू” या धोरणाला ठाम विरोध होता. त्या उलट भारत अणूशक्ती संपन्न म्हणजे अणू बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब शक्तिसंपन्न देश व्हावा, हा त्यांचा आग्रह होता. मग सावरकर विरोधी विचारवंत त्यांना कितीही युद्धखोर अथवा शांतता विरोधी ठरवोत, सावरकरांचे ते धोरणच आजच्या भारताला अणू तंत्रज्ञान निर्यात करण्यायोग्य असलेल्या देशांच्या पंक्तीत बसविण्यासाठी अचूक ठरले आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App