वृत्तसंस्था
बरेली – भाजपचे पिलीभीतचे खासदार वरूण गांधी यांचे केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या कृषी विषयक धोरणाबाबत गंभीर मतभेद झालेले दिसत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवरून वरूण गांधी यांनी आज पुन्हा एकदा योगी सरकारविरोधात निशाणा साधला आहे.Varun Gandhi again targets Yogi government; The government should pay attention to the problems of the farmers
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे, याकडे त्यांनी ट्विटरद्वारे लक्ष वेधले आहे. उत्तर प्रदेशातील शेतकरी समोध सिंह यांनी गेल्या १५ दिवसांपासून आपले धान बाजारात विकण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्याचा योग्य भाव मिळाला नाही. शेवटी त्यांनी धानाला आग लावली.
या घटनेचा विडिओ वरूण गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.याखेरीज बरेलीमधूनही त्यांनी योगी सरकारला चांगलेच सुनावले आहे. ते म्हणाले, की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. मी काही भ्रष्टाचार केलेला नाही. पण मला काही नेते माहिती आहेत,
Bareilly: Govt should accept farmers' demands. I haven't done any corruption but there're leaders who take money from police, mining…I haven't taken my MP salary, govt house… Public has given me power not to uplift myself but to uplift public & their issues: Varun Gandhi, BJP pic.twitter.com/T6AmzJLaJ0 — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 23, 2021
Bareilly: Govt should accept farmers' demands. I haven't done any corruption but there're leaders who take money from police, mining…I haven't taken my MP salary, govt house… Public has given me power not to uplift myself but to uplift public & their issues: Varun Gandhi, BJP pic.twitter.com/T6AmzJLaJ0
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 23, 2021
की जे पोलीसांकडून, खाण मालकांकडून पैसे घेतात. मी खासदाराचे वेतन घेत नाही आणि सरकारी घरातही राहात नाही. जनतेने मला अधिकार दिले आहेत ते स्वतःची प्रगती साधण्यासाठी नव्हे, तर जनतेची सेवा करण्यासाठी आणि जनतेची प्रगती साधण्यासाठी, हे मी कायम लक्षात ठेवतो, असा टोला देखील खासदार वरूण गांधी यांनी योगी सरकारला लगावला आहे.
उत्तर प्रदेश के किसान श्री समोध सिंह पिछले 15 दिनों से अपनी धान की फसल को बेचने के लिए मंडियों में मारे-मारे फिर रहे थे, जब धान बिका नहीं तो निराश होकर इसमें स्वयं आग लगा दी। इस व्यवस्था ने किसानों को कहाँ लाकर खड़ा कर दिया है? कृषि नीति पर पुनर्चिंतन आज की सबसे बड़ी ज़रूरत है। pic.twitter.com/z3EjYw9rIz — Varun Gandhi (@varungandhi80) October 23, 2021
उत्तर प्रदेश के किसान श्री समोध सिंह पिछले 15 दिनों से अपनी धान की फसल को बेचने के लिए मंडियों में मारे-मारे फिर रहे थे, जब धान बिका नहीं तो निराश होकर इसमें स्वयं आग लगा दी।
इस व्यवस्था ने किसानों को कहाँ लाकर खड़ा कर दिया है? कृषि नीति पर पुनर्चिंतन आज की सबसे बड़ी ज़रूरत है। pic.twitter.com/z3EjYw9rIz
— Varun Gandhi (@varungandhi80) October 23, 2021
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App