अमेरिकेच्या हिंसाचारादरम्यान भारतीय ध्वज फडकवणारा कॉंग्रेस नेता शशी थरूर यांचा मित्र

  • शशी थरूर यांनी केली खालच्या थराला जाऊन टिका तर वरूण गांधींनी केला पलटवार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतील अंतिम निकाल जाहीर होताना हजारो ट्रम्प समर्थकांनी कॉपिटॉल हिलवर अभूतपूर्व गदारोळ आणि हिंसाचार माजविला. यात ४ जणांचा बळी गेला. अमेरिकेच्या लोकशाहीच्या इतिहासातील हा अभूतपूर्व हल्ला ठरला आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करणारे ट्विट केले होते. अमेरिकेत शांततेतच सत्तांतर व्हावे, अशी भूमिका मांडली होती. friend of Congress leader Shashi Tharoor, who hoisted the Indian flag during the US violence

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक हिंसाचार करण्यासाठी वॉशिंग्टन डीसीमधील कॅपिटल इमारतीत घुसले. यावेळी शेकडो समर्थकांनी सिनेटमध्ये घुसखोरी केली, तोडफोड केली आणि अनेक कार्यालये ताब्यात घेतली.  अमेरिकेच्या कॅपिटल इमारतीत हिंसक निदर्शनांच्या विरोधात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अमेरिका आणि ट्रम्प समर्थकांचे झेंडे आहेत मात्र यांच्यात एक भारतीय ध्वज देखील दिसत आहे. त्याचवेळी कॅपिटल हिलच्या गदारोळात तिरंगा असल्याच्या व्हिडिओवरून कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर आणि भाजप नेते वरुण गांधी यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.

वरुण गांधींनी गुरुवारी एक व्हिडिओ ट्विट केला, ज्यामध्ये भारतीय तिरंगा कॅपिटल हिलच्या बाहेर झालेल्या गदारोळा दरम्यान फडकत होता. त्यांनी लिहिले, ‘तेथे भारतीय ध्वज का आहे? ही एक अशी लढाई आहे ज्यात भारताला कधीही भाग घ्यायचा नव्हता.

यावर कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी वरुणच्या ट्विटचे रिट्वीट लिहिले आहे की, काही भारतीय डोनाल्ड ट्रम्पच्या समर्थकांच्या मानसिकतेचेही आहेत, जे तिरंग्याचा सन्मान करण्याऐवजी शस्त्र म्हणून वापरतात आणि जे त्यांचा विरोध करतात त्यांना ते देशद्रोही म्हणतात. तेथे दिसणारा ध्वज आपल्या सर्वांसाठी एक चेतावणी आहे.

शशी थरूर यांना वरुण गांधींचे उत्तर

कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केलेल्या ट्विटवर वरुण गांधींनी प्रत्युत्तर दिले आहे. कॉंग्रेस नेते थरूर यांना उत्तर देतांना वरुण गांधींनी लिहिले की, आजकाल अभिमानाने तिरंगा हातात घेणार्या लोकांची चेष्टा करणे सोपे झाले आहे.

friend of Congress leader Shashi Tharoor, who hoisted the Indian flag during the US violence

तसेच, चुकीच्या उद्देशाने तिरंगा फडकवणे हे देखील सोपे झाले आहे.दुर्दैवाने अनेक लिबरल भारतातही देशविरोधी निदर्शनांमध्ये (जेएनयू प्रमाणे) तिरंग्याचा गैरवापर करतात.तिरंगा आमच्यासाठी अभिमानाचे प्रतीक आहे, ज्यामध्ये आम्ही कोणत्याही मानसिकतेशिवाय त्याचा आदर करतो.  शेवटच्या ट्विटमध्ये भाजप खासदार वरुण गांधी यांनी ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचारात तिरंगा फडकवणारा शशी थरूर यांचा मित्र असल्याचे देखील नमूद केले आहे. आता व्हिडिओ वर रिट्विट करून शशी थरूर स्वतःच त्यात फसले आहेत.

ट्विटर वर शशी थरूर यांचा क्लास

अमेरिकन दंगलीच्या वेळी भारताचा ध्वज पाहून लोकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकही याला ध्वजाचा अपमान म्हणत आहेत. त्याचवेळी लोकांनी कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*