लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर तोडफोड, एनआयए करणार तपास, पाक-खलिस्तान कटाचे इनपुट

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ब्रिटनची राजधानी लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर झालेल्या निदर्शन प्रकरणाची आता केंद्रीय तपास संस्था (NIA) चौकशी करणार आहे. या निषेध प्रकरणात पाकिस्तानी आणि खलिस्तानी समर्थकांशी संबंधित कटाचे इनपुट प्राप्त झाले आहेत, त्यानंतर एनआयएने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास टेकओव्हर केला आहे.Vandalism in front of Indian High Commission in London, NIA to investigate, input of Pak-Khalistan conspiracy

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गुन्हा नोंदवण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र, याप्रकरणी एनआयएकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 19 मार्च रोजी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने झाली होती. यावेळी तिरंग्याचा अपमानही होताना दिसला. या घटनेनंतर गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 24 मार्च रोजी खलिस्तानी आणि त्याच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केला. भारतीय दंड संहिता (आयपीसी), यूएपीए आणि पीडीपीपी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसह खलिस्तानी दहशतवाद्यांची भूमिका दिसून येत आहे, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी परवानगी दिली आहे.

भारतीय नागरिकांनी लंडनमध्ये दिले होते प्रत्युत्तर

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर घडलेल्या या घटनेबाबत ब्रिटनमधील भारतीय नागरिकांमध्येही संताप दिसून आला. उच्चायुक्तालयाबाहेर मोठ्या संख्येने भारतीय जमा झाले होते आणि तिरंगा फडकवून एकजूट दाखवून दिली होती. या भारतीयांमध्ये शीख लोकांचाही समावेश होता. सर्वांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. खलिस्तानींच्या कृतीला विरोध करणाऱ्या या भारतीय लोकांनी सांगितले की, हे लोक शांततेचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आता त्यांनी आमची एकजूट पाहिली पाहिजे.

Vandalism in front of Indian High Commission in London, NIA to investigate, input of Pak-Khalistan conspiracy

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात