वृत्तसंस्था
सिंगापूर : सिंगापूरमध्ये मंगळवारपासून किशोरवयीन मुलांना कोरोनाविरोधी लस दिली जाणार आहे. खास मुलांसाठी लसीकरणास सुरुवात करणारा सिंगापूर हा जगातील पहिला देश ठरणार आहे. Vaccinating adolescents ; Singapore will be the first country in the world
सिंगापूरमध्ये काही विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर तेथील सरकार हादरले. आता संसर्गाचे ट्रेसिंग आणि चाचण्या करण्यास मदत व्हावी, यासाठी हे लसीकरण सुरू केले जात आहे.
प्रौढांचे लसीकरण पूर्ण होण्यापूर्वीच किशोर-मुलांना लस देणारे सिंगापूर हा जगातील पहिला देश ठरला आहे. सिंगापूरमधील 39 वर्षांखालील वयोगटातील नागरिकांच्या अखेरच्या गटाचे लसीकरण पूर्ण होत असताना आता मुलाच्या लसीकरणास सुरुवात होत आहे.
जोपर्यंत जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होत नाही. तोपर्यंत कोणाला संसर्ग झाला हे ओळखणे कठीण होते. तसेच त्यांना वेगळे करून उपचार करणे शक्य होईल. असे करूनच कोरोनाची साथ आटोक्यात येण्यास मदत मिळेल, असा विश्वास पंतप्रधान ली हिसीयन लुंग यांनी व्यक्त केला आहे.
सिंगापूरचा राष्ट्रीय दिन 9 ऑगस्टला आहे. तो पर्यंत प्रत्येक नागरिकाला लसीचा पहिला डोस देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App