यूपी पोलिसांनी केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या घरी दुसरी नोटीस चिकटवली, आशिष मिश्रांना ९ ऑक्टोबरला हजर राहण्यास बजावले


लखीमपूर खीरी हिंसाचारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या निवासस्थानाबाहेर दुसरी नोटीस चिकटवली आहे. या नोटीसमध्ये त्यांचा मुलगा आशिष मिश्राला हिंसाचाराच्या संदर्भात 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता गुन्हे शाखेसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता आशिष मिश्रा ऊर्फ ​​मोनूला चौकशीसाठी बोलावले होते, पण ते गुन्हे शाखेसमोर हजर झाले नाहीत. डीआयजी उपेंद्र अग्रवाल, डीजीपी यांनी स्थापन केलेल्या पर्यवेक्षण समितीचे अध्यक्ष आणि इतर अधिकारी गुन्हे शाखेत आशिष मिश्रा येण्याची वाट पाहत बसले. Uttar Pradesh Police pastes another notice outside the residence of Union Minister Ajay Kumar Mishra in Lakhimpur Kheri


वृत्तसंस्था 

लखनऊ : लखीमपूर खीरी हिंसाचारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या निवासस्थानाबाहेर दुसरी नोटीस चिकटवली आहे. या नोटीसमध्ये त्यांचा मुलगा आशिष मिश्राला हिंसाचाराच्या संदर्भात 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता गुन्हे शाखेसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता आशिष मिश्रा ऊर्फ ​​मोनूला चौकशीसाठी बोलावले होते, पण ते गुन्हे शाखेसमोर हजर झाले नाहीत. डीआयजी उपेंद्र अग्रवाल, डीजीपी यांनी स्थापन केलेल्या पर्यवेक्षण समितीचे अध्यक्ष आणि इतर अधिकारी गुन्हे शाखेत आशिष मिश्रा येण्याची वाट पाहत बसले.

आशिष मिश्रा पोलिसांत हजर न झाल्याने आता ते नेपाळमध्ये पळून गेल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, त्यांचे कुटुंबीय मात्र ते कुठेही पळून गेले नसून वकिलांसह पोलिसांत हजर होणार असल्याचे सांगत आहेत. दरम्यान, गुरुवारी पोलिसांनी लखीमपूर येथील केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या निवासस्थानी नोटीस चिकटवली होती.



सर्वोच्च न्यायालयानेही यूपी सरकारला फटकारले

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसा प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. उत्तर प्रदेश सरकारच्या तपासावर नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने जोरदार फटकारले. न्यायालयाने यूपी सरकारचे वकील हरीश साळवे यांना विचारले की, खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपीला अटक का करण्यात आलेली नाही? हे करून तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे?

न्यायालयाने विचारले- तुम्ही देशातील इतर कोणत्याही खून प्रकरणात आरोपींना अशीच वागणूक द्याल का? केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष हा 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या लखीमपूर खेरी हिंसाचाराचा मुख्य आरोपी आहे, ज्यामध्ये 4 शेतकऱ्यांसह 8 लोकांचा बळी गेला होता.

डीजीपींना सूचना – पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ नये

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने स्पष्टपणे म्हटले की, लखीमपूर खीरी प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने आतापर्यंत जी पावले उचलली आहेत त्यावर ते समाधानी नाही. उत्तर प्रदेश सरकारने कोर्टाला सांगावे की, या प्रकरणाची कोणती एजन्सी चौकशी करू शकते. नवीन एजन्सीचा तपास सुरू होईपर्यंत पुराव्याशी छेडछाड होऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश न्यायालयाने राज्याच्या डीजीपींना दिले.

Uttar Pradesh Police pastes another notice outside the residence of Union Minister Ajay Kumar Mishra in Lakhimpur Kheri

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात