Uttar Pradesh:खाकी सोडून हातात कमळ ! दोन अधिकारी भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात


विशेष प्रतिनिधी

लखनौ : पाच राज्याच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. देशात उत्तर प्रदेशातील निवडणुक (Uttar Pradesh Assembly) सर्वात महत्वाची समजली जाते.Uttar Pradesh: Lotus in hand leaving khaki! Two BJP officials in the fray

सध्या उत्तरप्रदेशात नेत्यांचा पक्ष बदलण्याची कार्यक्रम सुरु असताना आता सनदी अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. येथील पोलिस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन हातात ‘कमळ’ घेणार आहेत.



कानपुरचे पोलिस आय़ुक्त असीम अरुण (Aseem Arun) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांनी आठ जानेवारी रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. ते कन्नोज येथून भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढविणार असल्याची चर्चा आहे.

तर दुसरीकडे लखनौ येथील अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) (ED) सहसंचालक राजेश्वर सिंह (Rajeshwar Singh) यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यांनी ऑगस्टमध्ये स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तेही भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

राजेश्वर सिंह यांनी भाजपात जाण्याबाबतच्या मुद्यावर काहीही बोलण्यास नकार दिला. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या व्हीआरएसबाबत तर्कवितर्क लावले जात होते. सिंह हे गाझियाबादच्या साहिबाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जाते.

Uttar Pradesh: Lotus in hand leaving khaki! Two BJP officials in the fray

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात